आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Five Good Things For Best Relation, Divya Marathi

चांगल्या नात्यांसाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनहेल्दी नात्यांमुळे नेहमीच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जीवनात तणावही निर्माण होतो; परंतु हेल्दी नात्यांमुळे स्वातंत्र्याचा अनुभव येतो. तसेच जीवनात उत्साह व चैतन्य येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हेल्दी आणि अनहेल्दी नात्यांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. हेल्दी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्या...


खरे प्रेम करणा-यांना शोधा
मी तुमच्यावर प्रेम करतो, असे म्हणणा-या व्यक्तींचा शोध घेणे कठीण नाही, तर अशा व्यक्तींचा शोध घेणे कठीण आहे, ज्या प्रेमाचा अर्थ समजतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घ्या, ज्या तुम्हाला तुमच्या गुणदोषांसह
स्वीकारतील. तुम्ही इतके महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात की, कोणीही तुमच्यावर खरे प्रेम करेल, हे कधीही विसरू नका. अशा व्यक्ती तुमच्यातील दोषांकडे दुर्लक्ष करतात. तसेच त्यांना तुमचा प्रामाणिकपणाही माहीत असतो.


इतरांचे ऐका; पण निर्णय स्वत:च घ्या
आपल्या प्रगतीची चावी कोणाकडे देऊ नका; ती आपल्याच खिशात ठेवा. नाते फक्त अधिकार आणि आज्ञेचे नाही, तर ते प्रेम व सन्मानाचे नाव आहे. दुस-यांच्या स्वप्नांसाठी आपण आपले पूर्ण जीवन देऊ शकत नाही. तुमच्यासाठी जे योग्य आहे त्यालाही स्थान मिळाले पाहिजे. मग तुमची काळजी घेणारे त्याच्याशी सहमत नसतील तरी चालेल. तुम्ही इतरांच्या हातातील बाहुले बनून राहू नका. दुस-यांचे ऐका; परंतु अंतरात्म्याचा आवाज ऐका, त्याचा अनुभव घ्या आणि स्वत:च निर्णय घ्या. तसेच तुमची चूक नसताना माफी मागू नका.