आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On France By Kathrin Mayar And Vivian Malt

रोमान्समुळे फ्रान्सचे आर्थिक संकट झाले गडद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सच्या अध्यक्षांना एवढे अधिकार असतात की, ज्यांचे इतर लोकशाही राष्ट्रांचे नेते फक्त स्वप्न पाहत असतात. तरीही राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद् आपल्या आगोदरच्या अध्यक्षांसारखे या समस्येला तोंड देत आहेत की, ते फ्रान्सला रुळावर आणू शकतात का? पॅरिसच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा निदर्शने करणा-यांची गर्दी दिसू लागली आहे. 26 जानेवारीला आक्रोश करण्याच्या दिवशी हजारो लोकांनी ओलांद् यांच्या आर्थिक धोरणांसह त्यांच्या खासगी जीवनावरही टीका केली होती. दोन फेब्रुवारीला हजारो लोक पुन्हा एकत्र आले. समलैंगिक जोडप्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्याच्या प्रस्तावाला जमावाने विरोध केला.
एका अभिनेत्रीशी ओलांद् यांच्या रोमान्सच्या बातम्या जगभरातील माध्यमांवर झळकत असतात. परंतु त्यांच्या आर्थिक योजनांवर लोकांची नजर आहे. जगाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने केवळ फ्रान्सची जनताच नव्हे, तर इतर देशही प्रभावित होतात.
फ्रान्समध्ये विदेशी गुंतवणुकीत गेल्या वर्षी 77 टक्के घसरण झाली. डिसेंबरमध्ये 33 लाख लोक बेकार होते. जीडीपीत सार्वजनिक क्षेत्राची भागीदारी 57 टक्के आहे. सर्वात जास्त रोजगार सरकारतर्फे पुरवला जातो. त्यामुळे गेल्या महिन्यात ओलांद आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्राध्यक्ष निवास एलसी पॅलेसमध्ये फ्रान्सला बिझनेससाठी अधिक अनुकूल बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा वॉशिंग्टनपासून बर्लिनपर्यंत सुटका झाल्यासारखे वाटले. समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राष्ट्राध्यक्ष निवडून आलेल्या व्यक्तीसाठी हा निर्णायक काळ आहे. ओलांद यांनी टाइमला सांगितले, फ्रेंच लोकांच्या महत्त्वाकांक्षांवर अंकुश ठेवण्याची त्यांची इच्छा नाही.
राष्ट्राध्यक्ष ग्लोबल राजकारणाचे खेळाडू आहेत. परंतु आपल्या जीवनाच्या दुस-या बाजूस लोकांचे लक्ष कें द्रित होण्याची त्यांना जाणीव आहे. गेल्या महिन्यात क्लोजर मासिकाने 59 वर्षीय राष्ट्राध्यक्षाचे 41 वर्षीय अभिनेत्री ज्युली गयेतसोबतच्या अफेअरची बातमी दिली होती. ओलांद सांगतात, खासगी जीवन कित्येकदा आव्हानात्मक असते. काही दिवसांनंतर त्यांनी त्यांची पत्नी पत्रकार व्हॅलरी ट्रायरव्हेलरला घटस्फोट दिला.
गेल्या काही आठवड्यांपासून फ्रेंच जनतेचा ओलांद यांच्याबद्दल हिरमोड झाला आहे. त्यांनी आपल्या कित्येक सिद्धांतांशी तडजोड केली आहे. 2015 ते 2017 दरम्यान सरकारी खर्चात कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. करकपातीसंदर्भात व्यावसायिकांशी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्या बदल्यात बिझनेस जगताला रोजगार वाढवावे लागणार आहेत.
फ्रान्समध्ये हे निवडणुकीचे वर्ष आहे. नगरपालिका, युरोपीयन व फ्रेंच संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ओलांद यांना एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी चमत्कार करावा लागणार आहे.
आकड्यांचा आरसा
० फ्रान्समध्ये बेरोजगारीचे प्रमाण युरो झोनच्या 12 टक्क्यांच्या तुलनेत 11 टक्के आहे.
० यंदा फ्रेंच अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर 0.9 टक्के राहण्याची शक्यता आहे.
० फ्रान्समध्ये विदेशी गुंतवणूक घसरली, परंतु जर्मनीत 500, स्पेनमध्ये 37 टक्के वाढली.
० तेल कंपनी टोटल आणि कॉस्मेटिक कंपनी लो रियलसह 31 फ्रेंच कंपन्या जगातील 500 मोठ्या कंपन्यांमध्ये सामील आहेत.