आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On General Motor, Divya Marathi, Merry Bara

मेरी बारा जीएमला पूर्वपदावर आणणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची सर्वात मोठी वाहन उद्योग कंपनी जनरल मोटर्स (जीएम) सध्या संकटातून जात आहे. कंपनीच्या 31 लाख कारांमध्ये दोष उघड झाले आहेत. जीएमच्या नव्या सीईओ मेरी बारा यांच्यासमोर कठीण आव्हान आहे. त्या कंपनीच्या संकेतस्थळावर तीन मिनिटे 53 सेकंदांच्या व्हीडिओमध्ये संकटांचे परिणान समोर ठेवतात. पुढे काय होऊ शकते, हे ग्राहकांना सांगतात. हेही सांगतात की, कंपनी कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा प्रशासन काँग्रेसच्या दोन समित्या आणि न्याय विभागाच्या चौकशीचा सामना करेल. त्या म्हणतात, या प्रक रणात आमच्या प्रक्रियेत गडबड झाली आहे. त्यामुळे परिणाम भयंकर आहेत.


व्हीडिओमध्ये बारा एखाद्या सामान्य अमेरिकन मध्यमवर्गीय महिलेसारख्या दिसतात. कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांच्या शक्तीची झलक दाखवणारी मेरिसा मायर, शेरिल सँडबर्ग यांसारख्या सीईओंपेक्षा त्या वेगळ्या आहेत. हे पाहणे मजेदार असेल की, अ‍ॅड व्हिटेक्रे डॉन एकरसनसह जीएमच्या वरिष्ठ अधिका-यांच्या रांगेत त्या किती तरी वेगळ्या आहेत. या लोकांच्या कार्यकाळातच लाखो कारा परत बोलवण्याचे संकट उभे ठाकले आहे. गुपचुप काम करणा-या बारा यांनी कंपनीत पुष्कळसा बदल केला आहे. त्या इंजिनिअर आहेत. अधिका-याचा तोरा त्यांना आवडत नाही. कंपनीत वेगवेगळ्या पदांवर राहिल्यानंतर त्यांनी जानेवारी सीईओपद सांभाळले.


ऑटो उद्योगात सदोष वाहने परत बोलवण्याच्या घटना नेहमीच घडत राहतात. साधारणपणे यातून वाहन निर्मिती कंपनीच्या समभाग मूल्यावर आणि कारभारावर फारसा फरक पडत नाही. मात्र लोकांना हे जाणवायला नको की, कंपनी हेतूपुरस्सर काही लपवते आहे. येथे प्रश्न आहे की, जीएमला 2001 च्या कारांमध्ये इग्निशन समस्येची कल्पना होती. तरी त्यांनी अगोदर हे का नाही सांगितले? सिटी ग्रुपच्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, अलीकडे अशा एका दोषामुळे कारभारात तोटा सहन करणारी एकमेव कंपनी टोयोटा आहे.
कंपनीने 19 मार्चला 2009-10 च्या कारा परत बोलवण्याच्या घोटाळ्यातील गुन्ह्याच्या तपासाला तोंड देण्यासाठी 1.2 अब्ज डॉलर देण्यावर सहमती दाखवली आहे. संकट निर्णायक स्तरावर परास्त करण्याऐवजी टाळाटाळ केली गेली होती. कंपनीला नव्या मॉडेलचे उत्पादन थांबवावे लागले आहे.


दुसरीकडे, बारा वेगाने काम करत आहेत. त्यांनी नवा वाहन सुरक्षाप्रमुख नेमला. संकटाला तोंड देण्यासाठी तीन अब्ज डॉलरची व्यवस्था केली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे. उत्पादन खर्च घटवला आहे. गुणवत्तेत सुधारणा केली आहे.