आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On General Motors CEO Merry Bara, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनरल मोटर्सला तारण्याचे आव्हान साहसी मेरींकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बारा यांना धुरा सांभाळताच आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सीईओ बनून दोन आठवडेच झाले होते की इग्निशन स्विचमधील त्रुटीमुळे जीएमला २६ लाख कार माघारी बोलवाव्या लागल्या होत्या. अमेरिकेचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अँटोन वालुकॉज यांचा ३२५ पानी चौकशी अहवाल कंपनीला आरोपीच्या पिंज-यात ओढण्यास पुरेसा आहे. अहवालात समर्थन करण्यात आले आहे की, जीएमला स्विचच्या समस्येबद्दल २००१ पासून माहिती होती. मात्र मौनाची संस्कृती, भ्रम आणि जबाबदारी टाळल्यामुळे कुणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

न्याय विभाग, संरक्षण आयोग आणि ४५ राज्यांचे अ‍ॅटर्नी जनरलसुद्धा कंपनीची चौकशी करत आहेत. कंपनीच्या विरोधात १०० खासगी खटले दाखल करण्यात आले आहेत. एवढ्यावरच अडचणी संपत नाहीत, यंदा कंपनीला विविध कारणांनी जवळपास दोन कोटी ७० लाख कार माघारी बोलवाव्या लागल्या आहेत.

बारा यांनी परिस्थितीचा ज्या पद्धतीने सामना केला, त्यांची कित्येक तज्ञांनी कौतुक केले आहे. जीएम संकटाच्या सावटातून काढण्यासाठी त्यांना बरेच काही करण्याची गरज आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आले होते. या वर्षी तिच्या नफ्यातील बराच मोठा वाटा कार माघारी बोलावण्यासाठी भेट दिले जाईल. तंत्रज्ञान, नव्या लक्झरी कार आणि चिनी बाजारपेठेच्या बळावर बारा कंपन्यांचे भविष्य उजळवू इच्छितात.

जागतिक बाजारपेठेत ब्यूक कारचा सर्वात मोठा खरेदीदार चीन आहे. २०१६ पर्यंत स्वयंचलित कार बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. ट्रक बाजारात त्यांना स्थान मिळवण्याचा इरादा आहे. कारच्या तुलनेत ट्रकच्या व्यवसायात अिधक नफा आहे. जीएमने सप्टेंबरमध्ये मध्यम आकाराच्या दोन ट्रक विक्रीस सुरुवात केली आहे. पुढील वर्षापर्यंत केडिलॉक, पाच नव्या शेवरले आणि व्होल्ट इलेक्ट्रिक कार येईल. इग्निशन स्विच संकट पाहता बारा जीएमच्या वाहनांना ऑटो इंडस्ट्रीत सर्वात सुरक्षित बनवू इच्छितात. मात्र असे करण्यासाठी त्यांना काॅर्पोरेट संस्कृती बदलावी लागेल. वालुकॉज अहवालाप्रमाणे कुणा व्यक्तीने कोणत्याही निर्णयाची जबाबदारी स्वीकारली नाही.

जीएम कंपनीसमोर ही समस्या अनेक वर्षांपासून आहे. प्रश्न हा आहे की, ज्या महिलेने त्या कल्चरबाहेर राहून काम नाही केले, जिला कंपनीने कॉलेज आणि बिझनेस स्कूलमध्ये शिकवले, जिचे वडील जीएममध्ये ३९ वर्षे काम करत होते, ती आमूलाग्र बदल घडवून
आणेल का? अनेकांना विश्वास आहे, त्या हे करू शकतात.

जनरल मोटर्स आणि बारा यांच्यासाठी पुढील १२ महिने महत्त्वपूर्ण असतील. कारण कंपनी अनेक नव्या वाहनांची सिरीज सादर करेल. सर्वप्रथम चार सिलिंडरचे कोलोरॅडो आणि केन्यान ट्रक येतील. त्यांना फोर्ड आणि रेमकडून आव्हान मिळेल. जीएमची सर्वाधिक विकली जाणारी क्रूझच्या नव्या मॉडेलच्या बॉडीत बदल करण्यात आला आहे. केडिलाकच्या नव्या स्वतंत्र विभागातून निघणा-या हायटेक कॅडीवर लोकांची नजर असेल. बारा यांनी वालुकाॅज अहवालाच्या शिफारशींवर कार्यवाहीला प्राधान्य दिले आहे. त्या म्हणतात, त्यांची टीम कारच्या सुरक्षेच्या पैलूवर लक्ष ठेवेल. कर्मचा-यांना खुल्या वातावरणासह ९० टक्के शिफारशींवर अंमलबजावणी झाली आहे. मेरी बारा २१ व्या शतकातील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या ‘केस स्टडी’चा विषयही असू शकतील.

मेरी बारा यांची दिनचर्या
५२ वर्षीय बारा यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजता होते. सर्वात अगोदर त्या बर्टन, मिशिगन येथील जीएमच्या वर्कशॉपला जातात. इथे खराब इग्निशन स्विच बदलण्याचे काम सुरू आहे. त्या कॉफी पिण्याऐवजी डाएट कोक सोबत बाळगतात. बारा सांगतात, माझा दिवस लवकर सुरू होतो. मला प्लँटमध्ये काम करण्याची सवय आहे. त्यांचा एक मुलगा जैवअभियांत्रिकी शिकत आहे. मुलीला फॅशन आणि लेखन आवडते. बारा यांचे लग्न २९ वर्षांपूर्वी टोनी बारा यांच्याशी झाले. त्या स्टायलिश परंतु व्यावहारिक आहेत. "टाइम'च्या प्रतिनिधीने त्यांच्या बुटांचा ब्रँड शोधायचा प्रयत्न केला तेव्हा म्हणाल्या, मेरी गुप्तता ठेवू इच्छितात. त्यांनी आग्रह केला आहे की, त्यांच्या बुटांचा ब्रँड जाहीर केला जाऊ नये.

वैशिष्ट्ये
* कार आणि मध्यम आकाराची ट्रकसारखी वाहने बनवणारी अमेरिकन कंपनी जनरल मोटर्समध्ये दोन लाख १९ हजार कर्मचारी.
*जीएमचा वार्षिक व्यवसाय १५० अब्ज डॉलर आहे. मुख्यालय डेट्रॉइटमध्ये आहे. कंपनी आता केडिलॉकचे बिझनेस युनिट न्यूयॉर्कमध्ये उघडेल.
* मेरी बारा आणि त्यांचा वडिलांचा कार्यकाळ (३९ वर्षे) मिळून बारा परिवार जीएमशी ७४ वर्षांपासून संबंधित आहे. सहायक अभियंता, अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, मनुष्यबळ प्रमुख, मॅन्युफॅक्चरिंग प्रमुख, उत्पादन विकास संचालक असे होत होत मेरी सीईओ बनल्या आहेत.
* माजी सीईओ डॉन एकरसन यांना वाटत होते की, मेरी बारा यांच्यात कंपनी बदलण्याची
क्षमता आहे.
* इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा अभ्यास करणा-या मेरी यांना कंपनीने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए करवले.