आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपीएस आणि गुगल नकाशांच्या काळात एखादे जेट विमान कसे होऊ शकते बेपत्ता?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमान वाहतूक उद्योगाचे विश्वासपात्र विमान 272 टन वजनाचे बोइंग 777 क्वालालुंपूर विमानतळावरून 8 मार्चला बीजिंगकडे झेपावल्यानंतर तासाभरात रडारच्या पडद्यावरून अदृश्य झाले. विमानाच्या शोधासाठी 26 देशांनी सुपरसॉनिक जेट विमान, उच्च तंत्रज्ञानाचे युद्धजन्य स्थितीवर नजर ठेवणारे उपग्रह लावले. मात्र एवढ्या दिवसांनंतरही हाती काही आले नाही. त्यामुळे 2014 मध्ये तंत्रज्ञानाच्या अपयशावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मलेशियन एअरलाइन्सची फ्लाइट एमएच 370 बेपत्ता होण्याची अनोखी घटना सध्याच्या काळात हैराण करणारी आहे. जगातील गुप्तहेर संस्था लाखो लोकांवर नजर ठेवतात. त्यांचे बोलणे ऐकते. सामान्य लोकांकडेदेखील ट्रेकिंगची आधुनिक सुविधा आहे. वेब ब्राउजरच्या माध्यमातून आपण हरवलेला आयफोन शोधू शकतो. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणा-या उपग्रहाचा पाठलाग करू शकतो. गुगल नकाशातून लांबवरच्या ठिकाणांचा शोध घेऊ शकतो. तरीदेखील 239 जणांना वाहून नेणारे 209 फूट लांबीच्या जंबो जेटचा तपास का करू शकत नाही? या प्रश्नांची उत्तरे चकित करतात.


विमान जर वायव्य दिशेला वळून मध्य आशियाच्या दिशेला गेले असते, तर भारत, पाकिस्तान, चीनसारख्या देशांच्या आणि अफगाणिस्तानात अमेरिक न लष्कराच्या रडारांनी ते पाहिले असते. खरे म्हणजे अकाशात लक्ष ठेवणारी पायाभूत सुविधा गोंधळलेली आहे. जोपर्यंत काही गंभीर घटना होत नाही तोवर वस्तू बदलत नाहीत. अमेरिकेच्या नेशन ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाशी 25 वर्षे संबंधित असलेले रॉबर्ट बेन्जोन सांगतात, आपल्या व्यवहारात काहींचा जीव गेल्यानंतरच लोकांची झोप उडते. आणखी एक गोष्ट बघा. एमएच 370 विमान ज्या भागात बेपत्ता झाले आहे, तेथे रडार बंद ठेवले जातात. ते तेथे तणाव वाढल्यावरच चालवले जातात. भल्या मोठ्या खर्चामुळे हवाई निगराणी व्यवस्था सरकारे नेहमी सुरू ठेवत नाही.


भारत, पाकिस्तानसह आशियाई देशांमधील अविश्वासाच्या भावनेमुळे सरकारे लष्करी दृष्टीने महत्त्वपूर्ण डेटा शेअर करत नाही. 18 मार्चला थायलँडने सांगितले की, एमएच 370 चा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटल्यावर काही वेळेनंतर त्याच्या लष्करी विमानाने बेपत्ता विमान पाहिले असावे. ही महत्त्वपूर्ण माहिती द्यायला थायलँडला दहा दिवस लागले. आंतरराष्ट्रीय सागरी सीमांवर लक्ष ठेवणे सोपे नाही. सागरकिनारी लावलेले रडार जमिनीपासून 400 किमीच्या पुढे पाहू शकत नाही. त्यामुळे एखाद्या उड्डाणाला वेगवेगळे ग्राउंड स्टेशन ट्रॅक करतात. अशा स्थितीत एखादे विमान रडारच्या कक्षेतून जाऊ शकते. रडार तंत्रज्ञान 70 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्याच्या निगराणीला मर्यादा आहेत. डोंगर, गोलाकार द-यांमध्ये ते पाहू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण विमान वाहतूक विभाग त्याचा अवलंब करत नाही. विमान वाहतूक तज्ज्ञ विल्यम लॉरेन्स म्हणतात, सध्याच्या तंत्रासह आपल्याला जीपीएस ट्रेकिंग पद्धत लागू केली पाहिजे. मात्र अमेरिकेसह जगातील अनेक भागांत रडार, रेडिओने काम चालवले जात आहे. 2020 पासून जीपीएस पद्धत एडीएस बी वापरण्याची अमेरिकेची योजना आहे. नवे तंत्रज्ञान खूपच खर्चिक आहे. जेट विमानात वायफाय लावण्याचा खर्च जवळपास अडीच लाख डॉलर आहे.


आधुनिक जीपीएस पद्धत बंद केल्यास काय होईल? कोणत्याही विमानाची संचार पद्धत पूर्णपणे बंद करणे शक्य आहे. विमानाच्या ट्रान्सपोंडरसोबत फ्लाइटची पूर्ण माहिती रेकॉर्ड करणारे ब्लॅक बॉक्स वैमानिक स्विच ऑफ करू शकतो. ब्लॅक बॉक्स मिळत नसेल, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. एमएच 370 चे फ्लाइट रेकॉर्डर 30 दिवसांपर्यंत संकेत पाठवू शकतो. मात्र ते पाण्यात 3.2 किमी खोल नसावे. दक्षिण हिंदी महासागराची खोली 3.2 किमीपेक्षा जास्त आहे. बेपत्ता विमान या भागात पडल्याची शक्यता आहे.


उड्डाणाशी संबंधित कम्युनिकेशन डिव्हाइस काय काम करतात
उपग्रह जीपीएस
० वैमानिकाला विमानाची स्थिती सांगण्यात मदत करतात.
० विमानाच्या स्थितीची माहिती ग्राउंड क न्ट्रोलला लाइव्ह मिळत नाही.
० दुर्घटनेनंतर ट्रान्समीटर लोकेशनचे संकेत पाठवतो. हा मर्यादित वेळेसाठी काम करतो.


रेडिओ
०ग्राउंड कन्ट्रोलशी बोलण्यासाठी वैमानिक रेडिओचा वापर करतात.
०दुर्गम भागात आणि पाण्याच्या वर रेडिओ संपर्कात अनेकदा अडथळे येतात.
एसीएआर
रेडिओ किंवा उपग्रहाद्वारे विमानाच्या सिस्टीमचा स्टेटस रिपोर्ट पाठवतो. रिपोर्टमध्ये विमानाच्या स्थानाची माहिती मिळू शकते.


रडार, ट्रान्सपोंडर
० जमिनीवर लावलेले रडार हवेत उडणा-या सर्व वस्तूंचे स्थान जाणतात. त्यांना ओळख दाखवायला सांगतात. विमानात लावलेले ट्रान्सपोंडर प्रतिसाद पाठवतात.
० रडार दुर्गम भाग आणि पाण्याच्या वर काम करत नाही. वैमानिक ट्रान्सपोंडरला बंद करून किंवा खाली उड्डाण करून रडारला टाळू शकतात.


ब्लॅक बॉक्स
हे दोन असतात. त्यात विमानाच्या सिस्टीमसंबंधी 25 तासांपर्यंतची माहिती असते. कॉकपिटच्या आवाजाचे दोन तासांचे रेकॉर्ड असते. दुर्घटनेच्या काळात सुरक्षित राहतील असे ते बनवले जातात. ते तीस दिवसांपर्यंत सिग्नल पाठवू शकतात.