आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:थायरॉइड हार्मोन्सचा अभाव; जिवाला धोका नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधमाशी सारख्या दिसणा-या थायरॉइड ग्लॅँड मानेखालील भागात स्थित एंडोक्राइन ग्लँड आहेत. त्यातून निघणारे हार्मोन्स ऊर्जा देतात. तसेच शरीराला गरम ठेवून मेंदू व हृदयाच्या स्नायूंसह दुस-या अवयवांना नियंत्रित करण्याचे काम करतात. मात्र, थायरॉइड हार्मोन्सच्या कमतरतेमुळे शरीरातील सामान्य प्रक्रिया प्रभावित होते. याला ‘हायपोथायरॉइडिज्म’ म्हटले जाते.
थायरॉइड ग्लँडमध्ये हार्मोन्स आवश्यक त्या प्रमाणात तयार होत नसल्याने शरीरातील अन्य प्रक्रियांची गती मंदावू लागते. ‘हायपोथायरॉइडिज्म’मुळे जास्त थकवा येणे, सर्दी-खोकला, त्वचेत कोरडेपणा, विसरण्याची समस्या, निराशा या समस्या उद‌्भवतात. हे शोधण्याचा ‘ब्लड टीएसएच टेस्ट’ हा पर्याय आहे. मात्र, यावर कोणताही उपचार नाही; परंतु थायरॉक्सिनच्या नियमित डोसमुळे यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तसेच शरीरावर ‘हायपोथायरॉइडिज्म’चा प्रभावही कमी होतो. तो नियंत्रित राहिल्यास लाइफस्पॅनला प्रभावित करीत नाही. याबाबत सुरुवातीला कळत नाही. कारण याची लक्षणे इतर आजारांशी मिळतीजुळती असतात. टीएसएच (थायरॉइड - स्टिम्युलेटिंग हार्मोन्स) टेस्टशिवाय टी-४ टेस्टच्या माध्यमातून शरीरातील थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण लक्षात येते. मात्र, एकदा का थायरॉइड झाल्यास त्यातून सुटणे मुश्कील असते; परंतु रुग्ण त्यावर १०० टक्के नियंत्रण ठेवू शकतो. थायरॉक्सिन रिप्लेसमेंटच्या माध्यमातून हार्मोन्सचे आवश्यक प्रमाण राखता येऊ शकते. त्यासाठी सिंथेटिक गोळ्यादेखील आहेत. थायरॉक्सिनचे प्रमाण नियंत्रणात असल्यास दुष्परिणाम जाणवत नाहीत. मात्र, गरजेपेक्षा जास्त घेतल्यास हायपोथायरॉइडिज्मची समस्या निर्माण होऊ शकते.