आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Health Mangement By Dr.Chandra M.Gulati, Divya Marathi

Health Mangement: कोणत्याही स्थितीत काही औषधे घेणे टाळलेलेच बरे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकसित देशांनी काही औषधांवर प्रतिबंध लादले आहेत. या औषधांची लिखित शिफारस डॉक्टर्स करू शकत नाहीत. यांची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. परंतु भारतात मात्र या औषधांची विक्री सुरू आहे. ही औषधे घेतल्याने हानी होऊ शकते किंवा ही औषधे गुणकारी नाहीत. त्यामुळे ही औषधे वापरू नका. ही औषधे पुढीलप्रमाणे...
फ्लुपेंथिक्सोल विथ मेलिट्रेसन कॉम्बिनेशन : डीएनक्सिट, प्लेसिडा आणि फ्रेंक्सिट हे याचे लोकप्रिय ब्रँड्स आहेत. डिप्रेशन दूर करण्यासाठी यांचा वापर होतो. यांचे कॉम्बिनेशन शरीराला हानीकारक असल्याने प्रतिबंध घातला आहे. याने बधिरता येते. डेन्मार्क, अमेरिका, युरोपीय संघ, ब्रिटन, कॅनडा आणि जपान या देशांमध्ये यावर बंदी आहे.
एसेनापाइन : एल्केपिन, एसेनाप्ट, डेफिनियम, वेलेनफ हे याचे लोकप्रिय ब्रँड्स. बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारासाठी ही औषधे वापरतात.
केटोकोनाजोल (ओरल) : याचे लोकप्रिय ब्रँड्स आहेत. फंगीसाइड, फनाजोल, निजराल, फायटोराल. फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी ही औषधे आहेत. केवळ एक महिना जरी याचा वापर केला तरी यकृत (लिव्हर) खराब होते.
पायोग्लिटाझोनवाली उत्पादने : डाविस्टा, ग्लिजोन, पायोग्लार, पायोग्लिट, पियोज आणि पियोझोन हे लोकप्रिय ब्रँड्स. ही डायबेटिसची औषधे आहेत. पण, ही औषधे घेतल्याने ब्लड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
कॅल्सिटॉनिन (इंट्रानसाल) : याचे लोकप्रिय ब्रँड्स आहेत मायकेल्सिस, जिकाल्सिट, केल्सिनेस, केल्सिनार आणि बोन्सपार. ऑस्टिओपोरोसिससाठी याचा वापर करतात. दीर्घकाळ ही औषधे घेतल्यास कॅन्सरची शक्यता वाढते. युरोपीय संघ आणि कॅनडाने यावर बंदी आणली आहे.
बुक्लीजाइन : लांजिफेने हे याचे लोकप्रिय ब्रँड आहे. लहान मुलांमध्ये भूक वाढवण्यासाठी म्हणून याचा वापर होतो. याच्या वापराने अंधुक दिसणे, युरिनेशनमध्ये जळजळ आदी त्रास उद्भवतात.
ओर्सिप्रिनेलाइन : एलुपेंट हे याचे ब्रँड आहे. अस्थम्यासाठी याचा वापर करतात. कार्डियाकवर साइड इफेक्ट होतात. ब्रिटनमध्ये बंदी आहे.