आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Health Mangement: सामान्य दर्जाचे अँटी डिप्रेसेंट हृदयासाठी धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोक अँटी डिप्रेसेंट म्हणजे तणावापासून दूर राहण्यासाठी म्हणून मिर्टाजेपाइन औषधे घेतात; परंतु या वर्षाच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा शोध लागला, यानुसार या औषधाचे सेवन केल्यामुळे हृदयाचे घातक विकार होतात, असे लक्षात आले आहे. कॅनडा आणि ब्रिटनच्या औषध नियामक प्राधिकरणाने तेथील डॉक्टरांना हे औषध रुग्णांना देण्यास बंदी आहे; पण औषध नियामक मंडळाच्या व्यवस्थापकांनी याबाबत कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत या औषधाच्या जोखमीबाबत डॉक्टर अपरिचित आहेत.

जे रुग्ण मिर्टाजेपाईन घेतात, त्यांच्या ईसीजी अहवालात हृदयातील विद्युत प्रक्रिया म्हणजे वैद्यकीय भाषेत क्यूटी असाधारण दिसून आली. काही रुग्णांमध्ये क्यूटी वाढल्याचे लक्षण दिसत नाही, पण काही रुग्णांमध्ये यामुळे हृदयाची गती असामान्य होऊ शकते. हृदयाच्या असाधारण गतीच्या लक्षणांना टॉरसेड डी पॉइंट्स आणि वेट्रिक्युलर टेक कार्डिया म्हणतात. यामुळे अचानक मृत्यू संभवतो.

हृदयाच्या असाधारण गतीची जी अधिकाधिक उदाहरणे समोर आली आहेत, ती
मिर्टाजेपाइनचे अधिक डोस घेतल्याने निर्माण झालेली आहेत; पण दुस-या काही सामान्य औषधांमुळेही क्यूटी असाधारण बनू शकते, मिर्टाजेपाइनबरोबर त्याचे सतत सेवन केल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसून आलेले आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिर्टाजेपाइन घेत असता, तेव्हा डॉक्टरांना तुमच्या हृदयाच्या विकाराबाबत जरूर माहिती द्या. तुम्हाला चक्कर येत असेल आणि बेशुद्ध होत असाल, तर डॉक्टरांना याची जरूर माहिती द्या... ही गोष्ट लक्षात असू द्या की, मिर्टाजेपाइन बरोबर एंटावर, लिनिड, लिनाक्स, लिजोलिड, लिजोमेक, जॉडलिन अशी जिवाणू प्रतिबंधके घेण्यास बंदी आहे. गर्भावस्था आणि मुलांना दूध पाजताना मिर्टाजेपाइन कधीही घेऊ नये.