पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतीय लोकांना हृदयासंदर्भातील आजार जास्त होण्याचा धोका असतो. यासाठी आनुवंशिक कारणांबरोबर धूम्रपान, लाइफस्टाइल यामुळे कार्डियाक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हृदयाचे आजार लक्षात घेऊन
आपण लहानपणापासूनच आपला आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष दिले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राच्या झालेला विकासामुळे रुग्णांना या आजाराचे नियंत्रण आणि यापासून मुक्ती मिळवणे सहज शक्य झाले आहे, परंतु या आजारावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यापासून मुक्ती मिळवणे कधीही चांगले आहे. यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि सुरुवातीलाच आजाराचे निदान झाल्यास त्यापासून मुक्त राहता येईल.काही वर्षांपूर्वी हृदविकार केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्येच (७० वर्षांपेक्षा जास्त) दिसून येत होता, परंतु आता ४० वर्षीय युवकही या आजाराने ग्रस्त आहेत. पुरेशी झोप होत नसल्यामुळे युवावस्थेतच मधुमेह आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता जास्त आहे. जेवण जास्त वेळ सुरक्षित ठेवणे आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी ट्रांस फॅटचा उपयोग करणे सामान्य झाले आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर सर्वात धोकादायक फॅटमध्ये होते. पर्यायाने ब्लड वेसेल्समध्ये ब्लॉकेजच वाढण्याचा धोकाही वाढतो.