Home »Divya Marathi Special» Article On How To Tackle Life's Problem

सामर्थ्य ओळखण्यासाठी संकटांशी झुंजा

डॉ. प्रभा चंद्रा | Jan 06, 2013, 03:45 AM IST

  • सामर्थ्य ओळखण्यासाठी संकटांशी झुंजा

नुकतेच मला एका छोट्याशा गावात जावे लागले. तेथे मला खंबीरपणा आणि सामर्थ्याचे अद्भुत दृश्य दिसले. कडाक्याच्या थंडीत दोन जण सकाळी मासे पकडायला निघाले. ते संपूर्ण ताकदीनिशी नाव समुद्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जिद्दी लाटा त्यांना पुढे जाण्यापासून रोखत होत्या. अडथळे आणत होत्या. थंडी खूप होती. लाटांच्या तडाख्याने दोघेही भिजले होते. लाटांना वाटत होते की ते हार पत्करतील, पण त्यांनी धीर सोडला नाही. ते जिद्दीला पेटले होते. पुढे घेऊन जाईल अशा एका मोठ्या लाटेची ते वाट पाहत होते.
त्यांचा आपसातील ताळमेळ अप्रतिम होता. ब-याच धडपडीनंतर त्यांची नाव पुढे सरकली. ती नाव अदृश्य होईपर्यंत मी तो संघर्ष पाहत होते. त्यातून दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. पहिली, आव्हानांचा सामना केला तरच यश हमखास मिळते. दुसरी, दृढसंकल्प आणि मानसिक अवस्था चांगली असेल तर जगणे अधिक सोपे, सुलभ होते. त्यातून लवचीकता येते. थोडी लवचीकता जन्मजात असते, तर थोडी शिकावी लागते.
कसल्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीने जीवनाबद्दल आपला दृष्टिकोन बदलता येतो. स्वत:वर आणि भावनांवर ज्यांचा ताबा असतो ते परिस्थितीला दीर्घकाळ दोष देत नाहीत. ते सर्व प्रसंगांतून जास्तीत जास्त शिकतात. अशा प्रकारच्या महिला स्वत:ला आणि आपल्या मुलांना ध्येयप्राप्तीसाठी अग्रेसर करतात. त्या आयुष्याकडे परिवर्तनाच्या दृष्टीने पाहतात. प्रत्येक क्षणी पुढे जाण्याच्या नव्या संधी त्या शोधतात. आपण जर एखाद्या अडचणीत सापडलात तर त्या परिस्थितीला काही नाव देऊ नका किंवा तिच्याबद्दल जास्त विचारही करू नका. अशा परिस्थितीला लेबल लावल्यास ती भावनांवर स्वार होते. परिस्थितीचा स्वीकार करा आणि पुढे चला. त्यातून आपली मानसिक अवस्था संतुलित राहील.
आपण जेव्हा स्वत:मधून बाहेर पडतो तेव्हा इतरांना मदत, सहकार्य करण्याची आपली मानसिक तयारी होते. उदाहरणार्थ एखाद्या आईचे मूल मानसिक व शारीरिकदृष्ट्या दुर्बल असते तेव्हा ती समाजाचा विचार करायला लागते. संकटकाळातच गुणवैशिष्ट्यांचा पत्ता लागतो आणि परिस्थिती उत्तमरीत्या हाताळण्याची कौशल्येही आपण शिकत असतो.
- प्रिव्हेन्शन नियतकालिकातून

Next Article

Recommended