आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी उद्योजक: एक लाखापासून सुरू केली कंपनी... २०१४मध्ये संपत्ती ५,६६७ अब्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: लॅरी इलिसन/सीईओ, ओरॅकल सॉफ्टवेअर

नऊ महिन्यांच्या वयातच न्यूमोनिया... अविवाहित आईचा मुलगा... महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण न करू शकणे... गरिबी अशा अनेक समस्यांमुळे कोणीही धीर सोडू शकतो; परंतु लॅरी इलिसन हे वेगळ्याच मातीचे बनले होते. १७ ऑगस्ट १९४४ मध्ये न्यूयॉर्क सिटीत जन्मलेल्या लॅरीची आई यहुदी होती. त्यांचे वडील एअरफोर्स पायलट होते. लॅरीच्या वडिलांनी त्यांच्या आईशी विवाह केला नाही. नऊ महिन्यांच्या वयात लॅरीला न्यूमोनिया झाला असता सावत्र आई-वडिलांकडे त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी सोपवली गेली. सावत्र आई प्रेम करीत होती; पण वडील त्यास नाकारत होते. अशा पद्धतीने सुरुवातीचे काही दिवस खूपच कठीण अवस्थेत जगणारे लॅरी जेव्हा सप्टेंबर २०११मध्ये जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले तेव्हा ‘रंक से राजा' ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडली.
लॅरी इलिसन यांनी २२ वर्षे वयात १९६६मध्ये पहिला संगणक डिझाइन केला.याच काळात ते कॅलिफोर्नियाला आले. तेथे संगणक डिझायनिंगशी संबंधित छोटे-मोठे काम करून ते उदरनिर्वाह करू लागले. त्यांच्या डोळ्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी १९७७मध्ये दोन हजार डॉलर रकमेतून आपल्या दोन सहका-यांसह सॉफ्टवेअर विकसित करणा-या प्रयोगशाळेची स्थापना केली. तिचे १९८२मध्ये ‘ओरॅकल सिस्टिम्स कॉर्पोरेशन’मध्ये रूपांतर झाले. १२०० डॉलर्समधून १०० डॉलर्स लॅरी यांचे होते, तर उर्वरित रक्कम सहका-यांकडून गोळा केली. ३७ वर्षांनंतर आज ‘ओरॅकल’मध्ये एक लाख २२ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी असून एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे. लॅरी यांना २०१४मध्ये फोर्ब्सने अमेरिकेतील तिसरी आणि जगातील पाचवी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले.
लॅरी यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी आहे. २००६मध्ये ते कॅलिफोर्नियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांना पायलटचा परवाना असून स्वत:ची दोन जेट विमानेही आहेत. कॅलिफोर्नियात आल्यानंतर त्यांनी ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये कामास सुरुवात केली. तेथे त्यांना ‘ओरॅकल’ची कल्पना सुचली होती. गरिबीत त्यांची पहिली बायको अदा क्वीनने त्यांची साथ सोडली. एसडीएलच्या स्थापनेपूर्वी त्यांनी नॅन्सी व्हीलरशी विवाह केला. मात्र, तो एकच वर्ष टिकला. १९८३मध्ये त्यांनी फिल्मी व्यक्तिमत्त्व बार्बरा बोथेशी विवाह केला. तो १९८६पर्यंत टिकला. त्यानंतर त्यांनी आपले मन पूर्णपणे कामात गुंतवले. १७ वर्षे एकटे राहिल्यानंतर त्यांनी मेलिना क्राफ्टशी विवाह केला. मात्र, २०१०मध्ये घटस्फोट घेतला.