आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरदात्यासोबतच मुलाखतकर्त्यालाही तयारी करणे गरजेचे असते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असाल तर त्यासाठी आपल्यालाही तयारी करणे आवश्यक असते. उमेदवार काय उत्तर देईल यापेक्षा आपण विचारत असलेला प्रश्न आणि त्यातून त्याला काय फायदा होईल, हे जाणणे महत्त्वाचे आहे. यासंबंधी अन्य काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून....

व्यावसायिक कौशल्यासाठी योग्य प्रश्न विचारा
कार्यालयातील एखाद्या पदासाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीची निवड करायची आहे. या वेळी कुणाची निवड करावी, कुणावर विश्वास ठेवावा किंवा कुणाला भागीदार बनवावे, हे ठरवण्यासाठी तुमच्यात लोकांना ओळखण्याची कला असायला हवी. तुमच्यात लोकांना ओळखण्याची क्षमता जितकी चांगली तितकाच या निवडीवेळी त्याचा फायदा होईल. अशा वेळी
उमेदवाराला, तुमची ताकद किंवा कमजोरी काय? आजपासून पाच वर्षांनंतर तुम्हाला काय करायचे आहे? कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला प्रेरणा मिळते? अशा प्रकारचे सामान्य प्रश्न विचारू नका. या प्रश्नांच्या उत्तरातून उमेदवाराचे व्यावसायिक कौशल्य जाणून घेण्याची संधी मिळत नाही. त्यापेक्षा उमेदवार देत असलेल्या प्रश्नांच्या फॉलोअपवर भर द्या. तुम्ही विचारलेल्या सुरुवातीच्या प्रश्नावर उमेदवाराने कशा प्रकारे उत्तर दिले, यावरून त्याच्याशी पुढील संवाद साधा. त्याने सुरुवातीलाच काहीसे सरधोपट उत्तर दिले आणि तुम्ही त्या उत्तराशी सहमत नसाल, तर त्याला तो प्रश्न नव्याने नव्या शैलीत विचारा. तुमच्या सक्षमतेचा कार्यालयीन कामकाजात कशा प्रकारे लाभ होऊ शकतो, असे प्रश्न तुम्ही उमेदवाराला विचारू शकता.
(स्रोत : टॅक्टिक्स फॉर आस्किंग गुड फॉलोअप क्वेश्चन्स बाय रिचर्ड डेव्हिस)

जुने कार्य पूर्ण केल्यानंतर नवी जबाबदारी सोपवा
कंपनीला पुढे कसे नेता येईल, याचा विचार करण्यासाठी नववर्षारंभ महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला हा विचार सार्थ ठरवायचा असेल तर त्यासाठी वेळ काढा. आधी दिलेले काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्या टीमवर नवे कार्य सोपवू नका. संबंधित बाबीचे प्राधान्यक्रम सांगणार नाही, तोपर्यंत लोकांना कोणते काम महत्त्वाचे आहे किंवा कोणत्या कामासाठी वेळ लागेल, हे कळणार नाही. यासाठी टीमला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे, हे त्यांना सांगा आणि त्याच्या
सुधारणेसाठी त्यांना पुरेसा वेळही द्या. (स्रोत : हेल्प युअर टीम स्पेंड टाइम ऑन राइट थिंग्ज)

जसे प्रेक्षक तसेच सादरीकरण केल्यास फायदा
एखादी गोष्ट शिकण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन बनवता तेव्हा ते प्रेक्षकांना आवडेल अशाच शैलीत बनवा. हे एक फर्स्ट कल्चर तत्त्व आहे. मात्र, अॅप्लिकेशन फर्स्ट कल्चर वेगळाच असतो. यात लोकांचे लक्ष विषयाच्या कारणामागे नव्हे, तर तो विषय नेमका कसा, याकडे असते. म्हणून प्रेझेंटेशन देतेवेळी थेट मुद्द्याला हात घाला. थिअरी समजवत बसण्यात वेळ न दवडता वास्तविक उदाहरणे द्या. त्यानंतर साधने व त्यापुढील पाय-यांवर चर्चा करा.
(स्रोत : टेलर युअर प्रेझेंटेशन टू फिट द कल्चर)

संदर्भांसाठी लोकांची अशा प्रकारे निवड करा
एखाद्याची नोकरीसाठी निवड करतेवेळी त्याच्याशी निगडित संदर्भांकडे दुर्लक्ष करू नका. मुलाखत प्रक्रियेत सामील होत असाल तर तुमच्या डोक्यात तुमच्या रेफरन्समधील काही सदस्यांची यादी बनवून घ्या. बॉस किंवा ज्यांच्यासोबत मिळून तुम्ही एखादा प्रकल्प यशस्वी बनवला असेल, अशा सहका-यांचा रेफरन्समध्ये समावेश करा. कुणी आपल्याविषयी नेमके
काय सांगेल, हे माहीत नसेल तर त्याला रेफरन्स बनवू नका. तुम्ही नोकरी बदलत आहात हे कार्यालयात कोणालाही कळू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाहेरील व्यक्तीलाही रेफरन्स म्हणून देऊ शकता. त्यामुळे उच्चपदस्थ व्यवस्थापनास आपल्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत आणि त्यांना तुमच्याकडून नेमके काय हवे आहे, हे यातून जाणून
घेता येईल. उदाहरणार्थ - त्यांना तुमच्या नेतृत्वशैलीबाबत जाणून घ्यायचे असेल तर ते थेट तुमच्या रिपोर्टींशी बोलू
शकतात. (स्रोत : हाऊ टू चूझ द राइट रेफरन्स बाय रेबेका नाइट)