आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराक : कधी न संपुष्टात येणारे युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून महिन्याच्या मध्यावर जेव्हा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड ग्रेटर सिरिया (आयएसआयएस) चे निर्मम लढणारे उत्तर इराकमध्ये पुढे सरकत होते, तेव्हा संघटनेच्या प्रवक्त्याने त्यांच्या शत्रूची शिल्ली उडवली होती. इराकचे पंतप्रधान नूरी अल् मलिकी यांना अंडरवियर व्यापारी म्हणून त्याने तंबी दिली की, त्यांचे सुन्नी लढाऊ शिया प्रभुत्ववाले मलिकी सरकारचा सूड घेणार. प्रवक्ता म्हणाला, परंतु बदल्याची ही कारवाई बगदादवर ताबा मिळवण्यापुरती मर्यादित राहणार नसेल. शियांचे पवित्र शहर नजफ आणि कर्बलावरदेखील कब्जा करणार. गरज पडल्यास सुन्नी लढाऊ त्यांचे अस्तित्व संपवण्यासाठी स्वत:चा जीव देतील.

ही प्रतिक्रिया इराक आणि मध्यपूर्वेच्या सध्याच्या घटनाक्रमासंबंधी बरेच काही बोलून जातो. आयएसआयएस पाकिस्तानपासून मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेपर्यंत सुरू असलेल्या पवित्र युद्धाची एक आघाडी आहे. आयएसआयएसद्वारे उत्तर इराकचे शहर मोसुलवर कब्जाच्या काही दिवसांपूर्वी सुन्नी कट्टरपंथीयांनी प्रेरित पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कराची विमानतळावरील हल्ल्यात 36 लोकांचा जीव घेतला. अल शवाबच्या जिहादी दहशतवाद्यांनी केनियामध्ये 15 जूनला 48 लोकांची हत्या केली. याच दिवशी अलकायदाच्या संशयित दहशतवाद्यांनी येमेनमध्ये लष्करी रुग्णालयाच्या स्टाफ बसवर हल्ला केला होता. बोको हरामने शेकडो नायजेरियन विद्यार्थिनींचे अपहरण हादेखील याच मोहिमेचा भाग आहे. 14 जूनला अफगाणिस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणा-या बुजुर्गांचे काळी शाई लावलेले बोट छाटणारे तालिबानी दहशतवादी काय संदेश देऊ इच्छित होते. ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे, परंतु त्याची तीव्र विचारसरणी आणि ईश्वराच्या नावे हत्येचा सिद्धांताचा बराच पुढेपर्यंत विस्तार झाला आहे.

आयएसआयएसच्या कारवाईने इराकचे विभाजन जवळपास निश्चित आहे. अमेरिकन फौजा इराकमधून पूर्णपणे मागे घेण्याच्या अडीच वर्षांनंतर जुने वैर देशाचे तुकडे करू पाहत आहे. इराकमध्ये जे काही होत आहे, ते सुन्नी आणि शिया मुस्लिमांमध्ये शतकानुशतके चालत आलेल्या ओढातणीचा नवा अध्याय आहे. सुन्नींच्या व्यवस्थेत शियांना कुठेही जागा नाही. हेच कारण आहे की, इराकच्या प्रमुख शिया धर्मगुरूने आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शियांना मैदानात उतरवले आहे.

इराकची स्थिती समजण्यासाठी मागील घटनाक्रमावर नजर टाकावी लागेल. 9/11 हल्ल्यानंतर जॉर्ज बुश यांनी सद्दाम यांना सत्तेवरून हटवण्यासाठी इराकवर हल्ला केला. बुश यांनी लोकशाही सरकार स्थापन करण्याचा इरादा ठेवला. सद्दामच्या जागी इराणसमर्थक शिया नेते अल मलिकी यांनी 2006 मध्ये सत्ता सांभाळली. त्याबरोबर सुन्नीबहुल देशांत धोक्याची घंटा वाजली. सौदी अरब, कुवैत व यूएई यांसारख्या तेलसमृद्ध राजेशाही चिंता करू लागल्या.

काय आहे आयएसआयएस आणि त्याचे लक्ष्य
@ आयएसआयएसच्या कारवाईनंतर अमेरिका इराण संयुक्त रणनीती आखण्यावर चर्चा करत आहेत. दोन्ही देश कित्येक वर्षांचे वैर विसरायला तयार आहेत.
@ शियापंथीयांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी इराण आणि हिज्बुल्ला या शिया लष्करी गटाने सिरियाचे अध्यक्ष असदला युद्धात बंडखोरांविरुद्ध मदत केली.
@ अमेरिका, इराक, इराण व कुर्द आयएसआयएसला पिटाळून लावण्यासाठी सहमत आहेत. खरे तर, आयएसआयएसवर हल्ल्याने आलेल्या स्थितीने कुर्दांना उत्तरी इराकवर कब्जा करण्याची संधी दिली आहे.

शतकानुशतके चालत आलेली प्रतिस्पर्धा
@इ. स. 632 मध्ये पैगंबर यांच्या निधनानंतर अनुयायी शिया व सुन्नी असे विभागले गेले.
@ दोन्ही पंथांची सांस्कृतिक, भौगोलिक व राजकीय ओळख आहे.
@ जगातील 1.6 अब्ज मुस्लिमांमध्ये सुमारे 90 टक्के सुन्नी पंथीय आहेत.
@ शियापंथीयांकडे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक सत्ता आहे.
@ इराणमध्ये शियांचे सरकार आहे. बरेचसे तेलसंपन्न क्षेत्र त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.
संघर्ष प्रभुत्वाचा
@इराकमध्ये सुन्नी अल्पसंख्यक आहेत. परंतु पहिल्या महायुद्धानंतर आणि सद्दाम हुसेनच्या शासनकाळात सुन्नींच्या हाती अनेक दशके सत्ता राहिली.
@2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनला पदच्युत करून शिया समर्थक सरकार स्थापन केले. तरीही देशात शिया-सुन्नी विभाजन सुरू राहिले. 2006-07 साली नागरीयुद्धाची स्थिती झाली होती.