आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त: फादर ऑफ डीएनएची वर्णद्वेषी म्हणूनही ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेम्स डी. वॉटसन :
प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते
-जन्म : ६ एप्रिल १९२८ (शिकागोमध्ये)
-शिक्षण : शिकागो विद्यापीठातून पदवी व इंडियाना विद्यापीठातून पीएचडी
-कुटुंब : पत्नी एलिझाबेथ आणि दोन मुले. आई- लॉक्लिन मिटशल, वडील- जीन मिटचेल
-चर्चेत : नोबेल पदक विकले. आता ते परत मिळणार.

प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ वॉटसन पदक विकून वादात अडकले आहेत. मात्र, त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत. आई-वडिलांचे एकुलते एक असलेले जेम्स स्कॉटलंडहून अमेरिकेला आले व तिथे स्थायिक झाले.
वडील ईश्वराला मानत नाहीत याचाच त्यांना आनंद वाटत होता. ते कॅथॉलिक होते, मात्र "अ‍ॅन एस्केपी फ्रॉम कॅथोलिक रिलिजन'च्या रूपात स्वत:ला दाखवत होते. लहानपणापासून ते बुद्धिमान होते. बाराव्या वर्षी ते प्रसिद्ध रेडिओ शो (क्विझ किड्स)मध्ये आले. उत्तरे पटापट देणा-या जेम्सना १५ व्या वर्षी शिष्यवृत्ती मिळाली व शिकागो विद्यापीठात प्रवेश घेतला.
वडिलांसोबत पक्षी निरीक्षण करण्याचा त्यांना छंद होता. १८ व्या वर्षी व्हॉट इज लाइफ नावाचे पुस्तक वाचले आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यात त्यांनी ऑर्निथोलॉजीऐवजी जेनेटिक्सचा पर्याय निवडला. मित्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त राहिले. त्यांचे सहकारी व हार्वर्डचे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ एडवर्ड ओ विल्सन यांनी असा वाईट
माणूस कधी पाहिला नव्हता, असे म्हटले आहे.

पीएचडीनंतर हार्वर्डमध्ये नोकरी करत असताना लोकांचे त्यांच्याप्रती मत चांगले नव्हते. त्यांच्या वक्तव्यातूनही ते दिसत होते. ते अनेक राजकीय कार्यक्रमांत भाग घेत. व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. कधी कल्पनाही केली नव्हती असे यश त्यांना १९६८ मध्ये मिळाले. डबल हेलिक्स या पुस्तकातून त्यांनी डीएनए रचनेची माहिती दिली.
आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या एलिझाबेथ यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या वेळी त्या जवळच्याच रेडक्लिफ कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांनी लग्नाविषयी मांडलेले मत असे, "मी चांगले आयुष्य जगणा-या मुलीच्या शोधात होतो आणि त्या वेळी एलिझाबेथ खूप सुंदर वाटली.' वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबमधून आठवडाभर निलंबित
करण्यात आले होते. त्यांचे वक्तव्य वर्णद्वेष व बुद्धिमत्तेशी संबंधित होते. १९९० मध्ये ते मानव जनुक प्रोजेक्टचे प्रमुख झाले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकांशीही त्यांचा वाद झाला. १९९२ मध्ये ते या प्रोजेक्टमधून बाहेर पडले.मात्र, १९९४ मध्ये त्यांच्यातील गुणवत्तेमुळे या प्रोजेक्टचे संचालक झाले.