आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश: प्रवेश नाकारलेल्या संस्थेतच आता लेक्चर देतोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
*जोश वॉलमॅन,
*वय : १९
*तंत्रज्ञ
6 महिन्यांची कमाई : रु. 6 कोटी

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने लहानपणापासून मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. दहाव्या वर्षात घरातील उपलब्ध सामग्री, खेळण्यातील सुट्या भागांपासून रोबो डिझाइन करण्यास सुरुवात केली होती. काही रोबो एवढे शक्तिशाली आणि उपयोगाचे होते की लहान वयातच त्याने अभियांत्रिकीच्या स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. वडील केमिकल अभियंते होते, त्यामुळे मुलातील अजब रसायनाचा त्यांना अंदाज आला. ते त्याला मार्गदर्शन करत असत. रोबो निर्मितीतून पारितोषिक मिळवण्याची ओढ निर्माण झाली. एकदा त्याने बचतीतील ५०० डॉलरमधून चीनहून काही वस्तू मागवल्या. यातूनच त्याने पहिला व्यावसायिक रोबो तयार केला. अभियांत्रिकीमध्ये आवड निर्माण होऊ लागल्यानंतर जोशने याच रोबोसह वर्ल्ड सिरीज इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्या रोबोच्या डिझाइन्सची मागणी केली.

१५ व्या वर्षातच त्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी फ्रीलान्स कन्सल्टन्सी देण्यास सुरुवात केली होती. मात्र, दुर्दैव म्हणजे अनेक विद्यापीठांमध्ये प्रयत्न करूनही प्रवेश मिळू शकला नाही. योगायोगाने याच विद्यापीठामध्ये तो आता लेक्चरसाठी जात आहे. मिप्रोतो या पहिल्या कंपनीच्या स्थापनेनंतर आता आरपीडी इंटरनॅशनल नावाने कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी ४० देशांमध्ये सप्लाय चेनचे काम करून क्रिएटिव्ह मॉडेल बनवत आहे. जोशने कंपनीला सहा महिन्यांत १० लाख डॉलर नफा मिळवून दिला.