आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त: सुनावणी सुरू असताना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा घेतला होता पवित्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त | न्या. सी. एस. करनन, मद्रास उच्च न्यायालय

वय- ५८ वर्षे
कुटुंब - पत्नी गृहिणी, दोन मुले- एस.के. सुगन, एस.के. कमलनाथ
चर्चेत - सर्वोच्च न्यायालयाच्या बदलीच्या आदेशावर स्वत: स्थगिती दिली.
२०११ ची घटना. आपण दलित असल्यामुळे सहकारी न्यायमूर्ती छळ करत असल्याची तक्रार अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आयोगाच्या एका न्यायाधीशाने केली होती. आपली भूमिका खूप कमी लेखले जात असल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले होते. एका न्यायाधीशांनी लग्न-समारंभातही अशी वागणूक दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. तक्रार करणारे हे न्यायाधीश होते न्या. सी. करनन.
जातीच्या आधारावर न्यायालयात चहापान आणि भोजनावेळी अशी वागणूक दिली जात असल्याचे करनन यांचे म्हणणे होते. मार्च २००९ मध्ये ते मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. काही दिवसांनंतर ते वादात अडकले. न्यायपालिकेची तक्रार ते लोकांमध्ये जाऊन करू लागले. २०१४ मध्ये त्यांनी जे काही केले ती बाब भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात कधीही झाली नव्हती. न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधीच्या जनहित याचिकेवर ज्या खंडपीठात सुनावणी सुरू होती, तिथे ते गेले. त्यांनी खंडपीठासमोर न्यायाधीशांची निवड अयोग्य प्रकारे केली जात आहे, असे बाेलण्यास सुरुवात केली.त्यांनी आपल्या नावाने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांनंतर या पावलावर कडक आक्षेप नोंदवला होता.
मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांचे याआधी न्या. सी. करनन यांच्या बदलीबाबत निवृत्त सरन्यायाधीश पी. सत्यशिवम यांच्याशी बोलणे झाले होते. न्या. अग्रवाल यांच्यानुसार, एकदा वकिलांकडून जेव्हा कामावर बहिष्कार टाकला जात होता, तेव्हा एक दिवस न्या. करनन त्यांच्या चेंबरमध्ये बळजबरीने घुसले आणि गोंधळ घालू लागले. यामुळे तिथे उपस्थित न्यायाधीशांनाही अवघडल्यासारखे झाले. या घटनेनंतर न्या. अग्रवाल यांनी त्यांच्या बदलीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी जातीयवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयात बदली केली तेव्हा त्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली. न्या. करनन यांनी १९९३ च्या कायद्याचा दाखला त्यासाठी दिला. त्यात म्हटले की, न्यायाधीशांची बदली लोकहिताच्या दृष्टीने व्हावी. करनन यांच्याकडे चेन्नईत बंगला आणि अन्य चार ठिकाणी घरे आहेत. पत्नीच्या नावावर चेन्नईत आणि पुद्दुचेरीमध्ये मालमत्ता आहे. संयुक्त कुटुंबाच्या नावे १० एकर जमीन आहे.