Home »Divya Marathi Special» Article On Kanjiwaram Saree

कार्यालयात दिसेल चंदेरी कांजिवरमची जादू!

अस्मिता अग्रवाल | Jan 06, 2013, 03:42 AM IST

  • कार्यालयात दिसेल चंदेरी कांजिवरमची जादू!

अनुराधा रमम यांनी सांगितले की, कळू लागले तेव्हापासूनच त्यांनी फॅशन डिझायनिंगला सुरुवात केली. त्यांचा बहुतांश वेळ डिझाइन तयार करण्यात आणि पूर्वीच्या डिझाइनमध्ये नावीन्य आणण्यात जातो व त्यातच त्यांना आनंद मिळतो. देशाचा समृद्ध वारसा डिझायनिंगमधून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. जॉर्जेट व शिफॉनच्या काळात महिला इक्कतस व बनारसीला विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जुनी कारागिरी व टेक्स्टाइलची परंपरा कायम ठेवण्यासाठी विणकरांच्या हातांना काम देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

फॅब्रिक बनवणे अवघड
डिझायनर टेक्स्टाइलकडे पाठ फिरवण्याची अनेक कारणे आहेत. रमम यांनी सांगितले की, हाताने बनवलेले फॅब्रिक जास्त प्रमाणात तयार करणे अवघड असते. या पद्धतीने कापड विणण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालते. मशरू, कांजीवरम, चंदेरी आणि महेश्वरीवर काम करताना त्यांना अभिमान वाटतो. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या फॅब्रिक जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या फॅब्रिकची परंपरा राखल्यास कापड विणणाºया कारागिरांना जीवदान मिळू शकते. शिफॉन, जॉर्जेटसारख्या फॅब्रिकची तुलना टेक्स्टाइल कारागिरांशी करणे चुकीचे आहे.

रंगांमध्ये नावीन्य
जास्तीत जास्त महिलांना या फॅब्रिक वापरता याव्यात म्हणून रंग व डिझाइनमध्ये बदल केले जात असून रमम नव्या पद्धतीने फॅब्रिक बनवत आहेत. यात काही नव्या घटकांचाही समावेश केला जात आहे. ‘वेअरेबल आर्ट’ असे नाव त्यांनी आपल्या कामाला दिले आहे. या फॅब्रिक अ‍ॅसेसरी म्हणून महिला वापरू शकतात.

असा बदला लूक
रमम यांनी टेक्स्टाइलमध्ये स्कार्फ, स्टोलची अनेक डिझाइन्स बनवली आहेत. त्या म्हणाल्या की, उन्हाळा-हिवाळ्यात महिलांना स्कार्फ किंवा स्टोल वापरणे आवडते. त्यातून संपूर्ण लूक बदलता येतो. बनारसीला त्या क्लासिक म्हणतात. हे फॅब्रिक अनेक वर्षांपासून प्रचलित आहे.

कट्सवर लक्ष
या फॅब्रिक कार्यालयात परिधान करण्यासाठीही योग्य आहेत. रमम यांनी हाताने तयार केलेले कुर्ते, पँट, जॅकेट, स्कार्फ, स्टोल बनवले आहेत. यात रंग व कट्सकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यांचे काम विणकरांवर अवलंबून आहे. त्यांना वेगवेगळे डिझाइन देऊन स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवायला त्या सांगतात. त्यामुळे ते गांभीर्याने काम करतात. टेक्स्टाइल आर्टिस्ट म्हणून ख्याती मिळवण्याची व आयुष्यभर याच फॅब्रिकवर काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

Next Article

Recommended