आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरच्या बिछान्यावर झोप, संग्रहात रणगाडाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केव्हिन यांना पाचव्या वाढदिवसानिमित्त हिटलरने दुस-या महायुद्धात वापरलेले स्टोर्मट्रूपर हेल्मेट मिळाले होते. याच घटनेने त्यांचे जीवन पालटून गेले. वडील टॉम ब्रिटिश लष्कराकडून लढले होते आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर एका जर्मन युवतीशी लग्न करून परतले होते. केव्हिन अर्धे ब्रिटिश, अर्धे जर्मन आहेत. सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर केव्हिन बर्थडेवेळी माँटे कार्लोची कार लिलावात खरेदी करण्यासाठी अडून बसले. हिटलरने १९३८ मध्ये सुदेटेनलँडमध्ये चालवलेली मर्सिडीझ कार अब्जाधीश पित्याने मुलाला भेट दिली होती. आता हा मुलगा ५५ वर्षांचा झाला असून हिटलरच्या साहित्याचा जगातील सर्वात जास्त संग्रह त्यांच्याकडेच आहे.
केव्हिन व्हीटक्राफ्ट | मोटर स्पोर्ट आंत्रप्रेन्युअर
>वय - ५५ वर्षे
>वडील - टॉम (ब्रिटिश लष्करात होते, नंतर बांधकाम कंपनीत) आई - लेनचेन (जर्मन), ६ भाऊ-बहिणी
>चर्चेत - हिटलरचे साहित्य आणि नाझी कालखंडातील सर्वाधिक संग्रह

केव्हिन १५ वर्षांचा झाला तेव्हा आजीने वाढदिवसाची भेट म्हणून दिलेल्या पैशातून दुस-या महायुद्धातील जीपची खरेदी केली आणि नंतर नफ्यात विकली. या नफ्यातून आणखी चार वाहने खरेदी केली आणि एक रणगाडाही खरेदी केला. १६ व्या वर्षी शाळा सोडलेल्या केव्हिननी तेव्हापासून काम करण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा ते लिसेस्टरशायरच्या इंजिनिअरिंग कंपनीत काम करू लागले. त्यानंतर वडिलांच्या बांधकाम कंपनीत रुजू झाले. त्यांच्या वडिलांनी युद्धानंतर आलेल्या बांधकाम क्षेत्रातील लाटेत एवढा पैसा कमावला की त्यांचे नाव अाज व्हीटक्राफ्ट संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत आले आहे. केव्हिन यांचा नाझी कालखंडातील वस्तू संग्रह करण्याचा छंद वाढतच गेला होता. विशेष म्हणजे त्यांनी याबाबतचा उल्लेख कुठेही केला नाही. ते ही सामग्री कडेकोट बंदोबस्तात ठेवत होते. त्यांचा नाझी संग्रह १० कोटी पाउंडचा आहे. संग्रह वाढवण्यासाठी त्यांनी जगभराचा दौराही केला आहे. त्यांच्या डायनिंग रूममध्ये हिटलरचा मेणाचा पुतळा आहे. हिटलरने तुरुंगात लिहिलेले वादग्रस्त पुस्तक "माइन काम्फ'ही त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे असलेल्या हिटलरच्या बिछान्यावरच ते झोपतात. हिटलरचा नाइट सूटही त्यांच्याकडे आहे.
बातम्या आणखी आहेत...