आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाचे शतक पूर्ण करण्याच्या अगोदर खुशवंतसिंग यांनी जगाचा निरोप घेतला. बिनधास्त आणि बेडर ग्रँड ओल्डमॅनने जे काही कार्य केले ते कोणत्याही जळमटलेल्या विचारांच्या पलीकडले आहे. निरीश्वरवादी असूनही त्यांनी जगातील सर्व धर्मग्रंथांचे सूक्ष्मपणे अध्ययन केले होते. पत्रकारितेमध्ये नवे अध्याय लिहिले, लेखनातून अभिव्यक्तीच्या मर्यादा ओलांडल्या आणि जीवन भरपूर जगले. शरीर वृद्ध, डोळे खोडकर आणि हृदय अजूनही तरुण आहे, असे खुद्द त्यांनीच एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. हेच त्यांचे यथार्थ वर्णन.
अल्प परिचय
* जन्म
2 फेब्रुवारी 1915 (हदाली, पंजाब, पाकिस्तान)
* वडील
सर शोभासिंग, लुटियन्स दिल्लीचे प्रख्यात बिल्डर
* पत्नी । कंवल मलिक
* मुलगा, मुलगी- राहुल, माला
* शिक्षण : मॉडर्न स्कूल नवी दिल्ली, गव्हर्नमेंट कॉलेज लाहोर आणि केम्ब्रिज विद्यापीठ. लंडनमधून कायद्याचे शिक्षण.
* निवास : वडिलांकडून 1945 मध्ये तयार करण्यात आलेले दिल्लीतील पहिले अपार्टमेंट ‘सुजन सिंह पार्क ’
* गौरव
1966 रॉकफेलर ग्रॅँट
1974 पद्मभूषण(1984 मध्ये सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्याच्या विरोधात पुरस्कार परत केला होता.)
2006 पंजाब रत्न
2007 पद्मविभूषण
2010 साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार
2012 ऑल इंडिया मायनॉरिटिज फोरम अॅन्युअल फेलोशिप पुरस्कार
* साहित्यरचना
1950 ते 2013
० 35 पेक्षा जास्त पुस्तके.
० 10 पेक्षा जास्त लघुकथा संग्रह.
० एक टीव्ही माहितीपट
(थर्ड वर्ल्ड)
वक्तव्यांवरून स्पष्ट होणारे व्यक्तिमत्त्व
* दिनचर्येसंबंधी
मी भाग्यवान आहे. या वयातही दररोज सायंकाळी व्हिस्की आणि चविष्ट पदार्थांचा आनंद घेत आहे.
शिकवण । आनंददायी सवयी अंगी बाणवा. नवीन गोष्टींचे परीक्षण करा.
* देशात असहिष्णुता
पसंत नसलेल्या पुस्तकांना जाळून टाकणारे आपण कोत्या वृत्तीचे लोक आहोत. कलाकारांना त्यांचे पेंटिंग बरबाद करून निर्वासित करतो. आपण विचार आणि आदर्शांच्या विरोधातील इतिहासाच्या पुस्तकांचे नुकसान करतो.
शिकवण । बुद्धी पक्षपाती नसावी. प्रत्येक विषय, वाद, व्यक्ती, धर्माचे परीक्षण करतानाही सर्व पैलूंवर लक्ष द्यायला हवे.
* पत्रकारितेविषयी
1969 मध्ये इलेस्ट्रेटेड वीकलीचे संपादक झाले. त्या वेळी त्यात लग्नाची छायाचित्रे छापली जात होती. काही दिवसानंतर मी फॉर्म्युला दिला- माहिती द्या, आश्चर्यचकित आणि प्रेरित करा. माझ्या आठ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये याचा खप 65 हजारांवरून साडे चार लाख रुपये झाला होता.
शिकवण : कोणतेही काम मनापासून करा. नवा प्रयोग करण्यास घाबरू नका. काळानुरूप स्वत:मध्ये बदल करत राहा.
* धर्माबाबत
मी स्वत:ला धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक शीख मानतो. लोक विरोध करत असतील तर करू देत. मला कोणताही फरक पडत नाही. मी खलिस्तानची बाजू घेणा-यांवर जाहीर टीका केली होती. भिंद्रानवालेना नरसंहारासाठी उतावीळ ठरवले होते.
* शिकवण : अंधविश्वासाकडे नेणा-या कोणत्याही गोष्टी मानायला नकोत. मग तो धर्म असो की परंपरा. प्रत्येक गोष्टीत आपला विवेक वापरावा.
स्थितप्रज्ञता । माझे सर्वात मोठे पाप म्हणजे मला स्थिर बसणेच ठाऊक नाही. एखाद्या बेचैन नदीसारखा आहे. बेचैन नदी कोट्यवधींना जीवन देत वाहत असते.
* शिकवण । स्वत: सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे व्यक्ती वय वाढल्यानंतरही अधिक ऊर्जावान राहू शकते.
* या पुस्तकांमुळे लौकिक मिळाला
* ट्रेन टू पाकिस्तान
भारत-पाकच्या फाळणीवर
* अ हिस्ट्री ऑफ सिख्स
शीख इतिहासाची संपूर्ण कथा
* देल्ही : अ नॉव्हेल
दिल्लीच्या इतिहासावर
* द कंपनी ऑफ वुमन
महिलांसोबतच्या संबंधावर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.