आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Kimat Ray Gupta, Hevels CMD, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशोगाथा : अवघ्या ५ मिनिटांत घेतला जर्मनीतील सिल्व्हेनियाच्या अधिग्रहणाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: मुलगा अनिलसोबत किमत राय.)

किमत राय गुप्ता : हेवेल्सचे सीएमडी
>शिक्षण : अर्ध्यातच सोडले.
>शिक्षण : पत्नी विनोद, कंपनीचा सहायक एमडी मुलगा अनिल.
चर्चेत कशामुळे? : ७७ वर्षीय गुप्ता जून २०१४ मध्ये अब्जाधीश झाले. फोर्ब्जच्या नुकत्याच जाहीर भारतीय अब्जाधीशांचा यादीत ते ४८ व्या स्थानावर आहेत.

पंजाबमध्ये शिक्षकाची नोकरी सोडून २१ व्या वर्षी किमत राय १९५८ मध्ये दिल्लीत आले. तेव्हा त्यांच्याकडे १० हजार रुपये होते. काकांच्या इलेक्ट्रिकल्सच्या व्यवसायात त्यांनी मदत करणे सुरू केले. अनुभव आल्यानंतर त्यांनी स्वत:चाच उद्योग टाकण्याचा निर्ण घेतला. केबल विक्री सुरू केली. या वाटचालीत त्यांनी १९७१ मध्ये दिवाळखोरीत निघालेली हेवेल्स कंपनी त्यांनी १० लाखांत खरेदी केली. पाच कंपन्यांचे अधिग्रहण करून हेवेल्सला जगातील चौथी मोठी कंपनी म्हणून मान मिळवून देणारे राय यांना २००७ मध्ये जागतिक बाजारपेठ काबीज करायची होती. त्यासाठी जर्मनीतील सिल्व्हेनिया कंपनी त्यांना ताब्यात घ्यावयाची होती. ही कंपनी हेवेल्सपेक्षा दीडपट मोठी होती. मुलगा अनिल राय आणि सीएफओ राजेश गुप्ता या व्यवहारातील संभाव्य नफ्या-तोट्याचे गणित मांडत असताना किमत राय यांनी पाचच मिनिटांत अधिग्रहणाचा निर्णय घेतला. करारावर स्वाक्ष-या करण्यासाठी अनिल राय लंडनला रवाना झाले. ही एक जोखीम होती. सकाळी अनिलने पित्याला फोन केला व २३ कोटींत व्यवहार झाल्याचे सांगितले. तेव्हा किमत राय म्हणाले, "या आकड्यांना महत्त्व नाही. हा व्यवहार प्रतिष्ठेचा आहे...'