कोणत्याही क्षेत्रातील अग्रगण्य असलेले लोक सामान्यांपैकीच एक असतात. मात्र, काही विशिष्ट सवयींमुळे ते सदैव पुढे असतात. अशा लोकांच्या गटात
आपल्यालाही सहभागी व्हायचे असल्यास पुढीलपैकी एखादी सवय अंगीकारायला हरकत नाही.
>या लोकांमध्ये कोणत्याही कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असते. तसेच आपल्या निर्णयावर ते दीर्घकाळ ठाम राहू शकतात.
>त्यांना आपल्यासारख्या लोकांसोबतच राहावे वाटते. त्यामुळे इतर अग्रगण्य लोकांच्या सवयीदेखील त्यांच्या स्वभावात दिसू लागतात.
>अशा लोकांना मन नसते, असे म्हणता येणार नाही. मात्र, ते कोणत्याही लोकांसोबत भावनात्मक पातळीवर नाते जोडू शकत नाहीत.
>मला वाटले, मी विचार केला, असे होऊ शकते, अशा प्रकारचे अनुमान लावणे या लोकांच्या स्वभावात बसत नाही. प्रॅक्टिकल गोष्टींवरच ते लक्ष केंद्रित करतात.
>इतरांसोबत काम करण्यास किंवा त्यांची मदत मागण्यात अशा लोकांना संकोच वाटत नाही. कुणाची मदत करणे किंवा कुणासोबत काम करणे त्यांना सोपे जाते.
>इतरांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे, यावर त्यांचा विश्वास असतो. ते इतरांचे आयुष्य बदलतात व असे करण्यास घाबरत नाहीत.
>आपल्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी ते एखादी प्रणाली विकसित करू शकतात. उदा. ते ज्ञानी लोकांच्या सहवासात राहतात, त्यामुळे त्यांच्यापासून मिळणा-या ज्ञानाने स्वत:चाही विकास करून घेतला जातो.
>आपल्याकडे असलेल्या देणगीसाठी ते नेहमीच परमेश्वराचे आभारी असतात. तसेच इतरांकडील सद्गुणांची स्तुती करण्यासही ते विसरत नाहीत.
>आनंदाच्या क्षणांची वाट पाहण्याऐवजी ते नेहमीच आनंदी राहतात.
>असे लोक छोटे छोटे प्लॅन तयार करतात, मात्र एक मोठा प्लॅनही त्यांच्या डोळ्यासमोर असतो. मोठे ध्येय गाठणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते.