आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिनिधित्व केल्यास लीडरच्या जबाबदा-या पार पाडणे सोपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यालयात काम करताना येणारे फोन कॉल्स, मेसेज, बैठकांना व्यत्यय न मानता त्यांच्याकडे संधी म्हणून पाहिल्यास फायदाच होईल. त्यामुळे नेतृत्वाची भीतीही कमी करता येईल. यासंबंधीच्या काही टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...

कार्यालयात पोहोचण्याचा वेळ लक्षात घेणे महत्त्वाचे
नोकरी आणि दैनंदिन जीवनात समतोल साधताना वेळेच्या व्यवस्थापनावर ब-याचदा चर्चा होत असते. त्यामुळे कार्यालयाचे ठिकाणही महत्त्वाचे आहे. अनेक लीडर्स प्रवास किंवा बदलीचा निर्णय घेतात तेव्हा त्यात त्यांच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. बहुतांश लीडर्सना लहान वयातच जागतिक पातळीवर अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे तरुण एक्झिक्युटिव्हजना नोकरीदरम्यान प्रवास हवा आहे की नको, याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. कुटुंब आणि करिअरमध्ये चांगली परिस्थिती असल्यास प्रवास करणे कठीण जात नाही.
(स्रोत : ‘मॅनेज युअर वर्क, मॅनेज युअर लाइफ’, बोरिस अँड रॉबिन)

अडथळ्यांकडे नव्या संधीच्या रूपात पाहिल्यास फायदाच
ऑफिसमध्ये अनेकदा कामाची यादी वाढतच जाते. त्यात बैठका, फोन कॉल्स, ईमेल, टेक्स्ट मेसेजेस, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी कामांचा समावेश असतो. अनेकदा अशा कामांमुळे आव्हानात्मक कामांसाठी वेळच मिळत नाही, असे वाटते. पण असे अडथळे कामाचाच एक भाग असून त्यामुळे तुम्ही कामापासून दूर जात आहात, असे नसते. असा दृष्टिकोन ठेवल्यास तुमच्याकडे अनेक संधी येतील. प्रत्येत अडथळ्याच्या माध्यमातून एक विषय हातावेगळा करता येईल. त्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यास नव्या आशा जागृत होतात, समस्यावर उपाय सापडतात. त्यामुळे या गोष्टींना व्यत्यय न मानता कामाचाच एक भाग समजल्यास काम अधिक चांगले होईल. काम करताना कुणी आपल्याशी बोलत असल्यास ते लक्षपूर्वक एका. त्यांना सकारात्मक उत्तर द्या. तुमच्या उत्तरामुळे उपस्थित व अनुपस्थित असे अनेक जण प्रभावित होऊ शकतात. कारण तुमचे काम इतरांशीच निगडित असेल.
(स्रोत: ‘टर्न युअर नेक्स्ट इंटरप्शन इन टू अपॉर्च्युनिटी’)

उत्पादनाची किंमत वाढवण्यापूर्वी पुढील गोष्टींवर लक्ष द्या
किंमत वाढवणे हा एक संवेदनशील विषय आहे. कुणालाही जास्त पैसे द्यायला आवडत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही किंमत वाढवण्याचा विचार करत आहात आणि इतरांनीही ते योग्य पद्धतीने घ्यावे, असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात घ्या. पैसे वाढवण्यापूर्वी, येत्या काळात उत्पादनाची किंमत 10 ते 30 टक्के वाढू शकते, फक्त 10 टक्केच वाढवा, अशी हिंट देता येईल. त्यामुळे फार पैसे द्यावे लागत आहेत, असे लोकांना वाटत नाही. वारंवार किमती वाढल्याने ग्राहकांचा विश्वास उडतो. आधी 10 ते 11 महिन्यांपूर्वी किमती वाढवल्या असतील, तर पुन्हा एकदा वाढवता येतील. तसेच यापुढे काही काळ किमती वाढवल्या जाणार नाहीत, असा संदेश पोहोचवणेही आवश्यक आहे.
(स्रोत: ‘द आर्ट ऑफ रेझिंग प्राइसेस: लेसन्स फ्रॉम कंपनीज’, रफी मोहंमद)

प्रतिनिधित्वाची भीती अशी कमी करता येईल
डेलिगेशन अर्थात प्रतिनिधित्व करण्याचे अनेक फायदे असले तरी त्यासाठी अनेक जण धजत नाहीत. प्रतिनिधित्व कौशल्य वाढवता येते. त्यामुळे टीमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमताही वाढेल. अशा वेळी आधी मनात येणा-या तीन चिंता नष्ट करण्याचा प्रयत्न करा. पहिली : ‘मी हे काम जास्त वेगाने करेन.’ प्रतिनिधित्व करण्याच्या योजनेत गेलेला वेळ चांगलाच असेल. त्यामुळे कर्मचा-यांनाही चांगले वाटेल. ते स्वत:ला कंपनीचा भाग समजतील. अधिक जबाबदा-या स्वीकारण्याचा प्रयत्न करतील. दुसरी : ‘मी यातून बाहेर पडल्यास काय होईल’. एखादे काम आपण चांगले करत असल्यास ते इतरांच्या हाती देणे कठीण असते. आपल्या खास कौशल्याचे मार्गदर्शन इतरांना करू शकता. तेव्हाही तुम्ही त्या कामाशी जुळलेले असाल, पण फक्त निरीक्षण कराल. तिसरी : ..‘पण ते चांगले काम करणार नाहीत.’ कामाची पद्धत नियंत्रित करण्याऐवजी टीमला दर्जाविषयी मार्गदर्शन करा. नवे दृष्टिकोन ठेवा. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते.
(स्रोत: डेलिगेटिंग वर्क : 20 मिनिट मॅनेजर सिरीज)

कंपनीचे ध्येय वा उद्देश योग्य पद्धतीने सांगा
बहुतांश कंपन्यांचे मिशन किंवा व्हिजन स्टेटमेंट ठरलेले असते. भविष्य सांगणारे ते एक अमूर्त निवेदन असते. टीममधील सदस्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्यासाठी व त्यांना विजयाचे प्रोत्साहन देण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा- स्पर्धेच्या युगात ग्राहकांचा विश्वास कशा जिंकता येईल. कर्मचा-यांच्या महत्त्वाकांक्षेला महत्त्व द्या. ते प्रेरणादायी ठरेल. त्यांना यशस्वी होण्यासाठी योग्य मार्ग दाखवा. सामान्य मार्ग दर्शवल्यास गोंधळ उडू शकतो. महत्त्वाकांक्षा मोठी ठेवा, अन्यथा विजय संपादन करणे कठीण आहे.
(स्रोत: ‘प्लेइंग टू विन स्ट्रॅटर्जी टूलकिट’)