आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांतिकारी समाजनायक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिडेल यांचा क्युबा म्हणजे अमेरिकन कंपन्यांसाटी जणू ‘बॅकयार्ड’. इथं यायचं, आपल्याला हवी तशी लूट करायची, सर्व नफा अमेरिकेत पाठवावा, अशी साखर आणि खाण क्षेत्रातील अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांची रीत होती. क्युबात लोकशाही व्यवस्था रुजणे, हे अमेरिकन सत्ताधारी व कंपन्या यांना कदापी मानवणारे नव्हते. त्यामुळे १९३३ मध्ये एका उठावाच्या मार्फत क्यूबा बॅटिस्टा नावाच्या लष्करी हुकूमशाहाच्या नियंत्रणाखाली आणला. मात्र, हुकुमशाहीचे अत्याचार क्युबन जनतेला सहन होणारे नव्हते. परिणामी क्युबन युवक आिण शेतकऱ्यांत उठावाची जबरदस्त प्रेरणा निर्माण झाली.त्याची पहिली ठिणगी १९५३ साली पडली. त्याचे नेतृत्व फिडेल आिण त्याचा लहान भाऊ राऊल यांनी केले. हा पहिला उठावा मोकांडा बॅरक म्हणून ओळखला जातो. पुढे फिडेलने आपल्या साथीदारांसह १९५९ मध्ये राजधानी हॅवानावर कब्जा केला. क्युबाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. फिडेल सत्तेवर येताच त्याने साक्षरता आिण सार्वत्रिक शिक्षण प्रासाराची मोहीम उघडली. स्वाभिमान आिण विश्वास यांवर आधारित नव्या जाणिवा िनर्माण केल्या. १ कोटी १२ लाखाच्या आिण अमेरिकेपासून १५० मैलावर असणाऱ्या या देशात आजही ‘केजी ते पीजी’ पर्यंतशिक्षण मोफत आहे. आरोग्य व्यवस्था संपूर्ण मोफत आहे. जनतेच्या इच्छेनुसार लैंगिक बदलाच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. खनिजावर आधारित ऊर्जा शक्तीचा कमी वापर करुन क्युबाने मनुष्य शक्ती, जनावरे आिण सौर शक्ती या पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा विकास केला, तसेच त्याच्या वापराचे दैनंदिन जीवनात कायम नवनवे मार्ग अवलंबले. १९९३ नंतर पर्यावरस्नेही जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या औषधांची निर्यात वाढवली. अत्यंत स्वस्त आरोग्य सेवेची निर्यात हे क्युबाने निर्माण केलेले प्रमेय आहे. मॅग्निनन, हेपॅटायटिस- बी, डेंग्यू आदी लसींचा शोध क्युबाने लावला आहे.क्युबात स्त्रियांचा सहभाग क्रांतीपासून सर्व क्षेत्रात राहिला आहे. आजही क्युबाच्या कायदेमंडळात ५० टक्के महिलांचा सहभाग आहे.
प्रा. अजित अभ्यंकर (लेखक डाव्या चळवळीतील आर्थिक, राजकीय अभ्यासक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...