आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Lesson From Great Thinker: मुलांवर दडपण नको, स्वत:हून शिकल्यास कौशल्यप्राप्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिन पिगे हे स्वित्झर्लंड येथील तत्त्ववेत्ते आणि मनोवैज्ञानिक होते. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1896 रोजी व मृत्यू 16 सप्टेंबर 1980 रोजी झाला.

'जुन्या कल्पनाही आपण नव्या पद्धतीने मांडू शकलो, तर आपली बुद्धी सक्रिय आहे, असे समजावे. जिन पिगे'

* लहान मुले ज्या गोष्टी स्वत:हून शिकतात, त्याविषयी त्यांच्याकडे खरी माहिती असते. वेळेपूर्वी आपण त्यांना काही शिकवायला गेल्यास त्यांना स्वत:हून शिकण्याची संधी कमी मिळते.
* ज्ञान हा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. हे सतत बदलत असते. अनेकदा बदलाचा वेग इतिहासापेक्षाही जास्त असतो.
* पुढे काय होणार, हे माहित नसताना ज्ञान आणि समजूतदारपणा आपल्यासाठी मार्गदर्शकाचे काम करतात.
* मागील पिढ्यांच्या रुळलेल्या मार्गावर नव्हे तर नवनवीन प्रयोगांद्वारे नवे आविष्कार साकार करणारे पुरुष आणि महिला तयार करणे हा शालेय शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
* तर्कशास्त्र आणि गणितात फार फरक नसतो. हे दोन्हीही विशिष्ट भाषेत रचनाबद्ध केलेले विषय अथवा शास्त्र आहेत.
* वास्तविकता जाणून घेणे म्हणजे आपण बदलासाठी एक अशी पद्धत विकसित करत आहोत, जी वास्तविकतेच्या जवळ असेल.
* तर्क, गणित आणि भौतिक ज्ञानाची विकास प्रक्रिया समजून घेण्यासाठी बाल्यावस्था ही खूप महत्त्वाची अवस्था आहे.
* ज्या गोष्टींशी आपण पूर्वीपासून परिचित आहोत, त्याच गोष्टींमधील फरक आपल्या लक्षात येतो. तसेच जे बदल डोळ्याने दिसतात, ते बदल आपल्याला अनुभवता येतात.
* आई-वडील आणि मुलांमधील नाते केवळ कर्तव्यपूर्तीसाठी नसते. त्यात प्रेमाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. आपण मुलांवर प्रेम करताना त्यांना औदार्य आणि त्यागाचे दर्शन घडते.
* प्रत्येक लहान मुलात एक प्रौढ आणि प्रत्येक वृद्ध व्यक्तीमध्ये एक लहान मूल दडलेले असते.
ठरावीक काळातच शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होतो, असे नाही. ही एक अखंडपणे सुरू असलेली प्रक्रिया आहे.
* आवश्यक गोष्टी वापरण्याची पद्धत समजून घ्यायला सुरुवात होते, तेव्हाच बाहेरील जगाची माहिती होते, पण त्या वेळी स्वत:ला समजून घेण्याची प्रक्रिया खुंटते.
* इतरांशी विचारांचे आदान-प्रदान आवश्यक आहे. कारण यामुळे असत्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता जास्त असते.