आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेताल वक्तव्ये : राजकीय नाइलाज की अज्ञान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणाचे वातावरण बेताल वक्तव्यांनी ढवळून निघाले आहे. राजकीय नेत्यांचा हा वाचाळपणा हा त्यांचा राजकीय नाइलाज आहे की अज्ञानतेचा परिणाम? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजकारणात एकमेकांवर आरोप करणे नेत्यांची सवय बनली असून अनेकवेळा हा त्यांचा नाइलाज असतो, परंतु गेल्या काही दिवसांपासून नेत्यांची जीभ ज्या पद्धतीने बरळत चालली आहे. त्यामुळे सामान्य जनताच नव्हे तर जुन्या पिढीतील राजकारणी सुद्धा अचंबित झाले आहेत. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने दुष्काळग्रस्त भागातील जनतेमध्ये असंतोष पसरला. अजित पवार यांचे वक्तव्ये संतापजनक आणि दुखदायी असे होते. दुष्काळाने होरपळणार्‍या जनतेला या विधानाने आणखी व्यतीत केले. अजित पवार यांच्या आधी देशातील अनेक नेत्यांनी सुद्धा वाचाळगिरी केली आहे. देशपातळीवर मोठे नाव असलेल्या नेत्यांना सुद्धा आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवता आलेले नाही. खरा प्रश्न असा आहे की एवढय़ा दिग्गज नेत्यांच्या तोंडून अशा गोष्टी कशा बाहेर पडतात. लोकप्रियता किंवा टाळ्या मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात काय ? की नेत्यांमधील संवेदना आणि नैतिकता कमी होत चालल्याची ही उदाहरणे मानावीत काय ?

गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर नजर टाकल्यास यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश दिसतो.अशी बेताल वक्तव्ये करण्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ,पंतप्रधानपदाचे संभावित उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी सुद्धा काही मागे नाहीत. ऑगस्ट 2012 मध्ये नरेंद्र मोदींनी मध्यमवर्गीय लोकांच्या मानसिकतेवर टिप्पणी करत म्हटले होते की, जास्त आकर्षक दिसण्याच्या बाबतीत हा वर्ग सजग असतो. आकर्षक दिसण्यासाठी गुजराती महिला कमी खातात असा तर्क त्यांनी गुजरातमधील वाढत्या कुपोषणासंबंधात दिला होता. स्लिम दिसण्यासाठी महिला कमी भोजन घेतात आणि कुपोषित दिसतात असे वक्तव्य त्यांनी केले होते, तर जानेवारी महिन्यात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी बलात्काराच्या वाढत्या घटनांसाठी पाश्चिमात्य संस्कृती आणि महिलांची फॅशन जबाबदार असल्याचे म्हटले होते.

2010 मध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख के. एस. सुदर्शन यांनी ‘सोनिया गांधी अमेरिकन सीआयएच्या एजंट आहेत’ असे वक्तव्य केले होते.

2011 मध्ये कृषिमंत्री शरद पवार यांना एका तरुणाने कानफटात मारल्यानंतर प्रतिक्रिया देताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘बस एकच थप्पड ’असे बेताल वक्तव्य केले होते.


गेल्या काही वर्षांत असे प्रकार वाढलेत

भारतीय राजकारणात वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा प्रकार वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांतील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर नजर टाकल्यास त्याची अनुभूती येईल. वरिष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी केलेली काही वादग्रस्त विधाने पुढीलप्रमाणे...

(पुढील स्लाइडमध्ये वाचा, नेते असे का बोलतात
वरिष्ठ राजकीय विश्लेषक वेदप्रताप वैदिक यांचे विश्लेषण. )