@लुसी ली, गोल्फर, अमेरिका
जन्म दिनांक : 1 ऑक्टोबर 2002
कुटुंब : वडील वॅरेन ली सिलिकॉन व्हॅलीत संगणक सल्लागार, आई माजी टेनिस खेळाडू एमी जेंग आणि भाऊ ल्यूक.
शिक्षण : इयत्ता सहावीत शिकत आहे.
लुसी ली जेव्हा तीन-चार वर्षांची होती त्या वेळी तिची आई एमी जेंग तिला संगीत, बॅले आणि अॅरोबिक्स शिकण्यासाठी प्रेरित करत असे. पण ती भाऊ ल्यूक याला गोल्फ खेळताना पाहत असे. तो तिचा आदर्श होता. रिकामा वेळ मिळाला की ती कॅलिफोर्नियाच्या रेडवूडस्थित घरापासून काही अंतरावरील मरीनर्स पॉइंटच्या गोल्फ कोर्सवर जात असे आणि गोल्फ स्टिक हाती घेत असे. एमीही दररोज तिच्यासोबत असे आणि तिचा सराव पाहत असे. तेथील इन्स्ट्रक्टर जॉबी रॉस यांनी तिच्यातील गुणवत्ता पाहून तिला शिकवण्यास सुरुवात केली.
लीने हळूहळू अनेक तास सराव सुरू केला. एमी सरावादरम्यान मुलीला जेवू घालायची. एकदा ली फील्डवर जोरजोरात रडत असल्याचे रॉस यांनी पाहिले. ती आईशी काहीतरी बोलतही होती. त्यांना वाटले, जास्त सरावामुळे ती थकली असावी आणि तिची आई तिच्यावर तेथे थांबण्यासाठी दबाव टाकत असावी. त्यानंतर कळले की, तिची आई घरी जाऊ इच्छित होती आणि लीला तेथेच थांबायचे होते.
ली सात वर्षांची झाली तेव्हा पीजीए आणि एलपीजीए टूरच्या खेळाडूंचे प्रशिक्षक मॅक्लीन यांनी लीला शिकवावे, असा आग्रह एमीने त्यांच्याकडे धरला. तिचे वय जाणून घेतल्यानंतर ते थक्कच झाले. त्यांना वाटले हे चूक आहे. पण मियामीत जेव्हा ते लीला भेटले आणि गोल्फबाबत तिचे समर्पण पाहिले तेव्हा ते नकार देऊ शकले नाहीत.
जन्म दिनांक : 1 ऑक्टोबर 2002
कुटुंब : वडील वॅरेन ली सिलिकॉन व्हॅलीत संगणक सल्लागार, आई माजी टेनिस खेळाडू एमी जेंग आणि भाऊ ल्यूक.