आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला संपत्ती जाणून घेण्याचा दिला हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम. श्रीधर आचार्युलू, केंद्रीय माहिती आयुक्त
जन्म - १० नोव्हेंबर १९५६
वडील - एम. एस. आचार्य, आई- रंगनायकम्मा
शिक्षण - मासूम अली हायस्कूल, एडब्ल्यू ज्युनियर कॉलेज, सीकेएम कॉलेज, लॉ कॉलेजमधून एलएलएम आणि ओरुमानिया युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ जर्नालिझम
चर्चेत - कोणत्याही शुक्रवारी अटक करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पनीला पतीची मालमत्ता, गुंतवणूक आदींची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. श्रीधर आचार्युलू यांनीच हा आदेश बजावला. कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त एका परित्यक्ता महिलेच्या अर्जावर हा आदेश बजावण्यात आला होता. संपत्तीची माहिती खासगी असते हा दावाही त्यांनी फेटाळला. त्याआधीपर्यंत अशा पद्धतीच्या माहितीला या अधिकाराअंतर्गत सांगितले जात नव्हते. मात्र, श्रीधर यांच्या निकालानंतर अशी माहिती मिळू लागली.

आंध्र प्रदेशच्या वारंगलमध्ये जन्मलेल्या श्रीधर यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. याबरोबर ते तेथून जनधर्म साप्ताहिक आणि वारंगल वाणी दैनिक चालवत होते. शिक्षणादरम्यान त्यांना पाच सुवर्णपदके मिळाली होती. शिक्षणानंतर ते नाल्सर विद्यापीठात कायद्याचे प्रोफेसर झाले. केंद्रीय माहिती आयुक्त झाल्याच्या दोन महिने आधी त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या रूपात गौरवण्यात आले. त्यांनी इंग्रजी व तेलुगु भाषेत कायदा आणि पत्रकारितेवर जवळपास २८ पुस्तके लिहिली आहेत. निकटवर्तीय त्यांना मदभूषी श्रीधर संबोधतात.

गेल्या वर्षीची घटना आहे. दिल्लीच्या एका शाळेच्या कर्मचा-यांनी आपले सर्व्हिस बुक आणि अन्य माहितीसाठी अर्ज केला होता, मात्र त्यांना ती मिळाली नाही. शिक्षिका साधनाने यावर माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला. दिल्लीत शिक्षण कायदा लागू असून अशी स्थिती आतापर्यंत ओढवली नव्हती. या प्रकरणाच्या निकालात श्रीधर आचार्युलू यांनी आरटीआय कायद्यातील तरतूद खासगी शाळांवरही लागू असल्याचा आदेश बजावला. हा आदेश दिल्ली शिक्षण कायदा किंवा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळा चालवली जात असली तरी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.