आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूजमेकर - नातवंडे या "कम्प्लिट मॅन'च्या विरोधात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुपती सिंघानिया ५८ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या मुलांनी आजोबा विजयपत सिंघानिया यांच्यावर खटला दाखल केला आहे. विजयपत यांचा थोरला मुलगा अर्थात मधुपती आणि धाकटा मुलगा गौतम यांच्यात संपत्तीची वाटणी झाली होती. ही १९९८ ची गोष्ट आहे, तेव्हा रेमंड समूहाची १६८० कोटी रुपयांची उलाढाल होती. तेव्हा ४० वर्षांचे असलेले मधुपती आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये राहतील, असे वाटणीच्या वेळी ठरले होते. यानंतर लगेच गौतम सिंघानिया यांना रेमंड कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले. कंपनीची धुरा त्यांच्या हाती सोपवण्यात आली. मधुपती त्यानंतर कधीच चर्चेत आले आले नाहीत. सिंगापूरमध्येच त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांप्रमाणेच मधुपतीसुद्धा पायलट होते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या उड्डयन विभागाच्या फेडरेशन एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने त्यांचे नाव पायलटच्या रूपात सामील करून घेतले आहे. वडील आणि भावाची त्यांना मदत मिळाली नसली, तरी मधुपती यांना सासरकडून मदत मिळाली. नुकताच त्यांच्या मुलांनी आजोबा विजयपत सिंघानिया यांच्याविरोधात संपत्तीवरून खटला दाखल केला आहे. यात मधुपती यांचे सासरे देवकुमार अग्रवाल यांची मुख्य भूमिका आहे. १७ वर्षांपूर्वी झालेल्या वाटणीची नातवंडांना कल्पना नव्हती. मागच्या वर्षी विजयपत सिंघानिया यांचा एकमेव नातू अर्थात मधुपती यांचा धाकटा मुलगा रेवतहरी १८ वर्षांचा झाला. तेव्हा त्याला याबाबत माहीत झाले. २००७ मध्ये मधुपती यांच्याकडे सुमारे ४ लाख ३५ हजार डॉलर किमतीचे भव्य खासगी जहाज होते.
१९१८ मध्ये जुग्गीलाल आणि त्यांचे चिरंजीव कमलापत सिंघानिया यांनी कपड्याचा व्यवसाय सुरू केला. १९२१ मध्ये कमलापत यांनी उत्तर भारतात पहिली कॉटन स्पिनिंग मिल सुरू केली. जुग्गीलाल आणि कमलापत या पितापुत्रांच्या कर्तृत्वामुळेच यास जेके ग्रुप म्हटले जाते. कमलापत यांचे थोरले पुत्र कैलाशपत यांचे चिरंजीव विजयपत यांनी रेमंड्सला जगभरात "कम्प्लिट मॅन'चा नावलौकिक मिळवून दिला. मुंबईचे शेरिफ राहिलेले विजयपत आता नातवंडांकडून मिळालेल्या आव्हानास तोंड देत आहेत.
वय: सुमारे ५८ वर्षे
वडील: विजयपत सिंघानिया, आई- आशादेवी, भाऊ- गौतम सिंघानिया
कुटुंब: पत्नी अनुराधा सिंघानिया, अपत्य- अनन्या (२९), रसालिका (२६), तारिणी (२०), रेवतहरी (१८).
चर्चेत, कारण- मधुपतींच्या मुलांनी १७ वर्षांनंतर आजोबांच्या संपत्तीप्रकरणी आव्हान दिले आहे.