आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Madhy Pradesh By Navneet Gurjar, Divya Marathi

काँग्रेससाठी मध्य नव्हे मंद प्रदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस काय, भाजप काय किंवा इतर. सा-याच पक्षांतील नेत्यांनी वेळ जेवढी वापरता येईल तेवढी वापरली. आता सात-आठ दिवस बाकी आहेत. खडाव घातलेली वेळ हळूहळू 7 एप्रिलच्या दिशेने जाऊ लागली आहे. मध्य प्रदेश मध्यस्थानी आहे. त्यामुळे निवडणुकीतील मारहाण, जातीपातीचे मुद्दे या दुष्परिणामांपासून दूर आहे. शांत आहे. यंदा येथे कोणताही मुद्दा नाही. ना राष्ट्रीय, ना प्रादेशिक किंवा अगदीच विभागाचाही नाही. केवळ मोदी आहेत. नरेंद्र मोदी. त्यांचे समर्थन आणि विरोध दिसतो. स्वाभाविकच आहे. त्यामुळे भाजप मोदींच्या नावाने मत मागत आहेत आणि उर्वरित पक्ष मोदींना विरोध करून विजयी होऊ इच्छितात. तसे तर इतर पक्षांसारखे देखील मध्य प्रदेशात काही नाही. भाजप आणि काँग्रेसच मैदानात आहे. एखाद्या जागेवर बसपा दिसते, परंतु तशी लाट आली तरी लगेच निघून जाते.
मतदारसंघांचा विचार केल्यास काँग्रेसकडून गुना आणि छिंदवाडा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. भाजपकडील काही कमकुवत उमेदवारांमुळे आणखी तीन-चार जागा काँग्रेसला निश्चित मिळतील, असा होरा आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला एकूण 6 किंवा 7 या आकड्यांवर समाधान मानावे लागेल, असे दिसते. विद्यमान लोकसभेत काँग्रेसकडे 12 जागा आहेत. अर्थात आगामी निवडणुकीत काँग्रेस निम्म्यावर येईल, असे दिसू लागले आहे. भाजपला मोदींचा आधार आहे. सध्या 16 जागा असलेल्या भाजपला यंदा 21 किंवा 22 जागा मिळू शकतील. सध्या बसपाकडे असलेल्या रिवा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे. या वेळी रिवा बसपाऐवजी भाजप किंवा काँग्रेसकडे जाईल, असे वाटते. सागरमध्ये भाजपची स्थिती फारशी चांगली नाही. वादाच्या भोव-यातून बाहेर पडावे. अन्यथा, भाजपला सागरमध्ये बुडणे अटळ आहे. हे विश्लेषण आजवरच्या स्थितीवर आधारित आहे. यंदा देखील एखादी लाट चालली तर सर्व अंदाज जागेवरच राहतील. राज्यात मतदान 10, 17 आणि 24 एप्रिलला आहे. मतदारराजा या तीन तारखांमध्ये आपला निर्णय देईल. अडवाणी वादानंतर भोपाळमध्ये भाजपकडून नवा चेहरा उतरवण्यात आला आहे, परंतु स्थिती सागरसारखी नाही. कमळाच्या मदतीने नौका किनारी लागेल, असे वाटते.