आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवर जाणा-या पापांकडे आज अनेक कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष चंद्रा, संचालक, सिक्सडी टेक्ना

जन्म: ३ जुलै १९७५, पाटण्यात

कुटुंब: सरिता(पत्नी, एचपीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर), दोन मुले-अगस्त्य आणि अक्षत पाटण्यात
एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आम्ही ज्या भागात राहत होतो तिथे आसपास सर्व टवाळखोर लोक होते. वडील पाटणा उच्च न्यायालयात काम करत. घरात तेच एकमेव कमावते होते. त्यामुळे ऐशोआरामाचे जीवन जगण्याचा प्रश्नच नव्हता. पापा सायकलवर कोर्टात जात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघर्ष केला. दोन भावांच्या शाळेचा विषय निघाला तेव्हा त्यांनी दोघांना एकाचवेळी शिक्षण होणे शक्य नाही, असे म्हटल्याचे ऐकले. यावर मी भावाला कॉन्व्हेन्टमध्ये प्रवेश द्यावा, असे म्हणालो. काही वर्षांनंतर परिस्थिती सुधारल्यानंतर मी हिंदी माध्यमातील शाळेत प्रवेश घेतला.

यानंतर वडिलांची रांचीला बदली झाली. घरात मार्गदर्शन करण्यासाठी मोठे कोणी नव्हते. अशात दहावी बोर्ड परीक्षेत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला. राज्यात अठरावा आलो. हिंदी माध्यमातील शिक्षणामुळे उच्च शिक्षणात अनेक अडचणी आल्या. बारावीनंतर बिहार कंबाइंड इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामनंतर बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची परीक्षा उत्तीर्ण होऊन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केले. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये टाटा स्टीलची नोकरी मिळाली. मात्र,देशासाठी काहीतरी करण्याची मला ओढ होती. त्यामुळे टाटा स्टीलऐवजी दिल्लीत येऊन आयएएसचा अभ्यास सुरू केला.
पैशाची चणचण भासू लागल्यामुळे मित्राने बंगळुरूतील सत्यम कंपनीत रुजू होण्याचा सल्ला दिला. सॉफ्टवेअर कंपनीचे कल्चर समजल्यानंतर सिक्सडी तंत्रज्ञान शिकले. खिशात जेवणासाठी पैसे नव्हते, आई-वडिलांना भविष्याबाबत चिंता होती. मात्र माझा दृढनिश्चय कायम होता. हळूहळू क्लायंट मिळू लागले. विदेशातून मागणी वाढू लागली. अमेरिकेत कार्यालय स्थापन केले, त्यात ४५० कर्मचारी काम करतात. कंपनीची उलाढाल १२० कोटी रुपये आहे.