आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिकन पक्षाने कशी उलटवली बाजी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१२ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या ओबामांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्ष संकटात पडण्याची चर्चा रंगली होती. अमेरिकेची ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) रिपब्लिकन प्रभावाच्या काही जिल्ह्यांमध्ये जिंकली होती. मात्र राष्ट्रीय स्तरावर प्रभावी दिसत नव्हती. पक्ष युवा आणि कृष्णवर्णीयांमध्ये अप्रिय होती. पक्षाची टी पार्टी आणि प्रमुख गटात मतभेद होते. परंतु चार नोव्हेंबरला रिपब्लिकनांनी सिनेट आणि प्रतिनिधी सदनाच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवून राजकीय वातावरण बदलून टाकले आहे.

रिपब्लिकनांच्या प्रभावाचे रेड स्टेट कन्सास ते डेमोक्रेट प्रभुत्वाचे ब्लू स्टेट मेरीलँडमध्ये मतदारांनी डेमोक्रेटिक पार्टी अजेय असल्याची धारणा नष्ट केली. नॉर्थ कॅरोलिना सिनेटच्या निवडणुकीत विक्रमी खर्चानंतरही डेमॉक्रेट हागन आपले स्थान टिकवून शकले नाहीत. जानेवारीत सभागृहनेते जॉन बोहनेर (पुन्हा जिंकल्यास) १९४७ नंतर रिपब्लिकन पक्षाचे सर्वात मोठ्या बहुमताचे नेतृत्व करतील. केंटुकीचेे सिनेटर मिच मेक्कॉनेल सिनेटचे नेता असतील. त्यांना रिपब्लिकन पक्ष परतण्याचे श्रेय दिले पाहिजे. २०१२ च्या आघातात मेक्कॉनेल यांनी जीओपीचा अजेंडा बदलण्याचा आग्रह नाकारला. त्यांनी फक्त २०१४ च्या निवडणूक संघर्षात लक्ष केंद्रित केले. मध्यावधी निवडणुकीची वर्षे रिपब्लिकनांचे मानले जातात. मेक्कॉनेल यांनी व्हाइट हाउसमध्ये ओबामा यांना लक्ष्य केले. दुसरीकडे डेमोक्रेट उमेदवार ओबामा यांचा उल्लेख करणे टाळत होते. चेम्बर ऑफ कॉमर्ससारख्या समूहांची मदत आणि अब्जाधीश बंधू डेव्हिड आणि चार्ल्स कोच यांसारख्या दात्यांच्या मदतीने मेक्कॉनेल यांनी निवडणूक अभियान ओबामांच्या असंतुष्ट मतदारांच्या लाटेत बदलले. त्यांनी पक्षात उद््भवलेल्या नवा गट टी पार्टीच्या असंतोषाला लगाम घातला. गव्हर्नरपद निवडणूक निकाल आश्चर्यकारक राहिले. निवडणूक विश्लेषक भविष्य वर्तवत होते की, जीओपी गव्हर्नरच्या दोन जागा गमावेल. त्याउलट रिपब्लिकनांनी तीन अतिरिक्त जागा बळकावल्या. इलिनॉयमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली भरडलेले गव्हर्नर पेट क्वीन यांना रिपब्लिकन ब्रूस राउनेर यांनी हरवले. मेसाचुसेट्स, मेरीलँड, विस्कान्सीन, ओहिओ, कन्सासमध्ये रिपब्लिकन गव्हर्नरांनी विजय मिळवला. खरे तर फ्लोरिडात दहा कोटी डॉलर खर्च करणारे स्कॉट काठावर जिंकले. २०१४ ची निवडणूक ओबामा सरकारवरील असंतुष्ट मतदारांच्या रागाचा परिपाक आहे.

विशेष बाबी
- २०१४ ची निवडणूक नकारात्मक प्रचारासाठी आठवणीत राहील.
- चेम्बर ऑफ कॉमर्सने रिपब्लिकनच्या बाजूने ७ कोटी डॉलर खर्च केले.
- चेम्बर समर्थित १५ पैकी १४ उमेदवार विजयी झाले.
- रिपब्लिकन उमेदवारांना एक वर्षापूर्वी प्रचाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
- सोबत जे न्यूटन स्मॉल, हेजार्ड, अ‍ॅलेक्स अल्टमन, जेके जे मिलर, अ‍ॅलेक्स रोजर्स