आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही सौंदर्यवती, डॉक्टर आहे टेस्ट ट्यूब बेबी, पटकावलाय मिस वर्ल्डचा किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड
*जन्म : २२ एप्रिल १९९२
*कुटुंब : वडील - डॉ. हॅनी स्ट्रॉस, आई- नर्स टेरेसा स्ट्रॉस
*शिक्षण : मेडिकलची विद्यार्थिनी

चर्चेत का? - नुकताच तिला मिस वर्ल्ड किताब मिळाला.

दक्षिण आफ्रिकेच्या वोल्क्सरस्ट येथील डॉक्टर पिता व नर्स असलेल्या आईची ही कन्या, वयाच्या ८ व्या वर्षीच ग्लॅमरच्या जगात येऊ इच्छित होती. रोलिन टेस्ट ट्यूब बेबी आहे. वर्ष २००० मध्ये रोलिनने मिस साऊथ आफ्रिका समारंभ पाहिला. तिला या समारंभाची भुरळच पडली.

तिने आपले स्वप्न साध्य करण्यासाठी पालकांच्या अपेक्षांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. वडील हॅनी डॉक्टर असल्याने त्यांना आपल्या मुलीनेही याच व्यवसायात यावे, असे वाटत होते. वडिलांचे स्वप्नही रोलिनने पूर्ण केले. ती वैद्यकीय शाखेच्या चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने स्वत:चे स्वप्नही आता साध्य केले आहे. वर्ष २००७ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी एलिट मॉडेल लूक इंटरनॅशनलसाठी तिची निवड झाली. ५५ प्रतिस्पर्ध्यांवर मात करत टॉप १५ मॉडेल्समध्ये तिची निवड झाली.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून विश्वसुंदरीची निवड ४० वर्षांपूर्वी झाली होती. काही दिवसांपूर्वी मिस होंडुरास मारिया जोस (१९) हिची तिच्या बहिणीसह हत्या करण्यात आली होती. रोलिन विश्वसुंदरी झाल्यानंतर आता होंडुरासला भेट देणार आहे. मिस होंडुरासच्या स्मृतिप्रीत्यर्थ ती एक शाळा सुरू करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील ब्लोक्राँस ब्रिज जगातील सर्वात उंच बंजी जम्पिंग ब्रिज आहे. या ब्रिजवरून जम्प करणे माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग असल्याचे रोलिनने सांगितले.
पुढील स्लाईडवर बघा, रोलिन स्ट्रॉस मिस वर्ल्डचे देखणे फोटो...