आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूजमेकर: पहिल्याच लढतीत दबाव झुगारून रचल्या १२० धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूजमेकर | मिताली राज , भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान

शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणा-या पारंपरिक दक्षिण भारतीय कुटुंबात तिचा जन्म झाला. आई-वडिलांनी मितालीला खेळासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, पुरुषांच्या खेळात मिताली काय करणार? असे म्हणत संपूर्ण कुटुंबाने विरोध केला. आई-वडिलांनी याची जाणीव होऊ दिली नाही आणि त्यांच्याच सांगण्यावरून मितालीने खेळण्यास सुरुवात केली. मिताली म्हणाली, आळशी असल्यामुळे आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. आजही तिला झोप खूप प्रिय आहे. मूळ तेलंगणातील हे कुटुंब गुजरातमध्ये वास्तव्यास आहे. वडिलांनी हवाई दलात नोकरी केली. त्यांची शेवटची पोस्टिंग गुजरातमध्ये होती.

जन्म - ३ डिसेंबर १९८२
वडील - दोराई राज (हवाई दलात अधिकारी होते)
चर्चेत - एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा रचणारी देशातील पहिली आणि जगातील दुसरी महिला खेळाडू ठरली.
मितालीची पहिल्या सामान्यातील १२० धावांची खेळी
>मितालीने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास शुभारंभ केला. १७ व्या वर्षी तिचे संघात पदार्पण झाले. आयर्लंड संघाविरुद्ध संधी मिळाली खरी, पण ती दडपणाखाली होती. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी झाली तर पुढे संधी मिळेल, असा विचार घोळत होता. हैदराबादच्या मितालीने अझरुद्दीनच्या शतकी खेळीचा पहिला सामना आठवला आणि १२० धावा कुटल्या.
मितालीचा जन्म गुजरातमधील, वास्तव्य मात्र हैदराबादेत
>२००२ च्या महिला विश्वचषकावेळी मितालीला टायफॉइड झाला होता. यामुळे तिचा वेग मंदावला होता. मात्र, ती मागे हटली नाही.
>२००२ मध्येही तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना केरेन रोल्डनचा कसोटीतील २०९ धावांचा विक्रम मोडला.
>२००३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित
>२००५ मध्ये विश्वचषक क्रिकेटमध्ये पहिल्यांदा महिला संघाचे नेतृत्व केले. तेव्हा माजी कप्तानासह अनेक सीनियर होते. तोपर्यंत ती देशांतर्गत संघाची कप्तानही झाली नव्हती.
>२००५ मधील टाचेच्या दुखापतीचा २०१२ पर्यंत त्रास जाणवत होता. त्यामुळे क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार आला.
>२००९ नंतर खेळणार नव्हती, पण पुन्हा नव्या जोमाने खेळू लागली.
- या वर्षी पद््मश्रीने सन्मानित केले. विराट कोहलीलाही तिच्यासोबत गौरवण्यात आले.