आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Modi And Fadanvis By Pramod Chunchuwar

मोदी का साथ... फडणवीस सुसाट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला साधे मुख्य शिक्षकही बनवले नाही त्याला आम्ही मुख्यमंत्री बनवत आहोत,'' या शब्दात भाजपचे अध्यक्ष शहांनी भाजपच्या एका आमदाराला फटकारले. हा आमदार फडणवीसांना मुख्यमंत्री करू नका असे सांगायला आला होता. शहा केवळ फटकारूनच थांबले नाही तर त्यांनी फडणवीसचे विरोधक असाल तर लगेच चालते व्हा, असे सुनावले. या घटनेतून अनेक अर्थ निघतात. मात्र हे तर स्पष्ट आहे की फडणवीसांना राज्यातील बहुसंख्य आमदारांची पसंती नव्हती. मात्र पक्षश्रेष्ठींपुढे कुणाचे चालेल, भाजपमध्येच काँग्रेस संस्कृती मजबूत होतेय. वाजपेयींच्या काळात भाजपच्या काँग्रेसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली ती फडणवीसांच्या निवडीने पूर्ण झाली. त्यामुळेच नितीन गडकरी समर्थकांचे शक्तिप्रदर्शन असो की विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेण्याची औपचारिकताही न करता थेट निवड लादण्याचा हायकमांडचा हेकेखोरपणा भाजप आता काँग्रेसयुक्त झाली असल्याचे दिसून आले.
गोपीनाथ मुंडे हयात असतानाच मोदींची पसंती फडणवीसांनाच होती, हे नवे तथ्य समोर आले. मुंडेंनंतर खरे तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव उचित ठरले असते. राज्यातील काँग्रेस सरकारचे सिंचन घोटाळ्यासह अनेक घोटाळे चव्हाट्यावर आणण्याचे काम खडसेंनी गेल्या पाच वर्षांत आक्रमक,अभ्यासूपणे केले. त्यांची भाषणे ऐकणे हा विधानसभेचे वार्तांकन करणा-या पत्रकारांसाठी एक पर्वणीच असायची. विरोधी पक्षनेता हाच भावी मुख्यमंत्री मानला जातो. ज्येष्ठता, वक्तृत्व, अभ्यास, आर्थिक जाण व मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव हे गुण असतानाही खडसे डावलले गेले. मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव नसलेले फडणवीस काय वा आमदारकीचाही अनुभव नसताना मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले शपथविधीच्या २४ तासानंतरही शिवसेनेला मलाईदार खात्यांचे लॉलीपॉप दाखवण्यासाठी खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही. साधेपणाचा उदोउदो करणा-या भाजपने शपथविधीवर कोट्यवधी खर्च केलेत. हा जनतेचा पहिला अपेक्षाभंग होता.