आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Motherhood By Dr.Shailaja Sen, Divya Marathi

एकेरी माता असाल तर मुलांच्या चांगल्या देखभालीसाठी लक्षात ठेवा या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेरी पितृत्व किंवा मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे एक आव्हान असते. मात्र काही उपायांनी ही जबाबदारी सहज पेलता येते. अशा पालकांसमोर मुख्य समस्या ही असते की, इतर मुलांनी आपल्या पाल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची? तुझे बाबा कुठे आहेत, ते तुमच्यासोबत का राहत नाहीत, अशा प्रश्नांना मुलांना नेहमी तोंड द्यावे लागते. पण या उत्तरांसाठी मुलांना सदैव तत्पर राहायला सांगा. वयानुसार गोष्टी, चित्रपट, पुस्तके इत्यादी माध्यमातून त्यांना याबाबत जाणीव करून द्या. बाबा नाहीत म्हणून काय झाले, आई, आजी, मावशी आणि मामा आहेत, असे उत्तर द्यायला शिकवा.
दुसरे म्हणजे, मुलांना समाजातील रूढी-परंपरांवर प्रश्न उपस्थित करायला शिकवा. आपण वेगळे असल्यामुळे इतरांपेक्षा कमी आहोत असे नाही, ही जाणीव त्यांना करून द्या. तुम्ही आनंदी व आत्मविश्वासू दिसलात तर मुलेदेखील आनंदी आणि आत्मविश्वासू बनतील.
तिसरे म्हणजे, बाबा नसले तरी काही ज्येष्ठांच्या मदतीने नेहमी मुलांची काळजी घेत राहा. आपल्याला त्यांची काळजी आहे, ही जाणीव नेहमी करून द्या. मित्र व कुटुंबासोबत सण, उत्सव, सुट्या आणि वाढदिवस साजरे करा.

चौथा उपाय म्हणजे, आपल्या आनंदाला प्राधान्य द्या. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा. मुलांना फक्त आनंदी आई हवी असते. प्रिन्स्टन सोशोलॉजिस्ट सारा एस. मॅक्लानाहन म्हणतात की, घरात भरपूर पैसे, आई-वडील दोघेही असले, मात्र ताणतणाव असेल, आई-वडिलांमध्ये दररोज भांडणे होत असतील तर ही परिस्थिती मुलांसाठी जास्त घातक असते. एकेरी पालकत्व असले तरी चांगला पैसा आणि तणावरहित कौटुंबिक वातावरण, भांडणे नसल्यास असे वातावरण मुलांसाठी जास्त पोषक असते.