आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायव्हर, वेट्रेसपर्यंत केली विविध कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* नीला वासवानी, लेखिका
जन्म : ११सप्टेंबर १९७४
शिक्षण: कल्चरलस्टडीजमध्ये पीएचडी
कुटुंब: पती- हॉल्टर ग्रॅहम (अमेरिकी अभिनेता)
चर्चेत: ‘आयअॅम मलाला’ या ऑडिओ व्हर्जनसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
नीला यांचे वडील भारतीय वंशाचे, तर आई आयरिश कॅथॉलिक आहे. नीला पतीसोबत न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या जगातील १०० संस्थांमध्ये रायटर इन रेसिडन्स म्हणून कार्यरत आहेत. त्यात आयआयटी हैदराबादचाही समावेश आहे.

त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी त्यांना वेट्रेसची नोकरी केली. यामध्ये कॉमेडी क्लबपासून चिकनच्या दुकानांचा समावेश आहे. शाळेतील कर्जाची परतफेड न्यूयॉर्कमध्ये कॉकटेल वेट्रेसची नोकरी करून केली. याशिवाय नीला यांनी जनावरांना चारा देणे, टेलिफोन बुक्स देणे, पिक्चरची तिकिटे विकणे, मोलकरणीचे काम करणे, स्टेज मॅनेजर, खासगी सचिव, आइस्क्रीम ट्रकचे चालक म्हणून काम केले. पती, भारतीय रेल्वे यंत्रणा, लोणचे आणि वनामध्ये पुस्तक वाचन करणे हे आपणास सर्वाधिक आवडते, असे त्यांचे म्हणणे आहे. नीलाचे पुस्तकप्रेम मासे आणि पाण्यासारखे आहे. त्या जेवतानाही पुस्तक वाचतात. ‘यू हॅव गिव्हन मी कंट्री’ हे पुस्तक आईवडिलांनी वाचल्यानंतर त्यांना काय वाटेल,अशी भीती मनात होती. वाचल्यानंतर ते नीला यांचा द्वेष करतील असे वाटले. परंतु झाले उलटे. पुस्तक वाचायला घेतल्यानंतर चहाचा पहिला घोट घेतला आणि त्यानंतर पुढील ८८ पानांनंतर दुसरा घोट प्यायल्याचे वडिलांनी सांगितले. रात्री वाजेपर्यंत पुस्तक वाचत राहिले. या पुस्तकामुळे आपल्याला रडू कोसळल्याची भावना त्यांच्या आईने व्यक्त केली.