आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On New Companies In Silicon Valley For Investment Competition

सिलिकॉन व्हॅलीच्या नवीन कंपन्यांत गुंतवणुकीसाठी स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या नवे उद्योजक सिलिकॉन व्हॅलीकडे वळू लागले आहेत. डाऊ जोन्स व्हेंचर सोर्सद्वारा १५ जानेवारीला प्रसिद्ध डाटानुसार २०१४ मध्ये अमेरिकेत व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक ३१३१ अब्ज रु. राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे ४७ टक्के अधिक आहे. २००० मध्ये पहिल्या डॉटकॉम बूमनंतर पहिल्यांदा इतकी गुंतवणूक झाली आहे. त्यातून मोठा निधी नावाजलेल्या कंपन्यांनी केली आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी मेसेजिंग अॅप स्नॅपचॅटने २८११ कोटी रु. आणि टॅक्सी सेवा उबेरने ७३ अब्ज रुपये उभे केले. प्राइसवॉटर हाउस कूपर्सचे विश्लेषक मार्क मॅककेफरी म्हणतात, २०१४ मध्ये असे ४७ मेगा करार झाले. ऑनलाइन गुंतवणूकदाराला मदत करणारी कंपनी सर्किल अॅपचे संस्थापक रोरी एकिन सांगतात, या वेळी दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत
अधिक पैसे उपलब्ध आहेत. डाऊ जोन्सचा डाटा सांगतो की, गुंतवणूकदारांचे लक्ष कोणत्या क्षेत्रांवर आहे.

स्मार्टर गॅजेट्स
सिलिकॉन व्हॅलीत हार्डवेअर बनवणा-यांची नेहमीच मागणी राहिली आहे. त्याच्या वाट्याला ७५५ अब्ज रुपये आले. गेल्या वर्षी गुंतवणूकदारांवर ग्राहकाचे जीवन सुलभ आणि आरोग्यदायी बनवणा-या डिव्हाइसचा प्रभाव राहिला. उदाहरणार्थ, हरवलेल्या चाव्या शोधणा-या कार्ड टाइलने ७९ कोटी रुपये जमवले. कपड्यांमध्ये फिटनेस ट्रेकिंग तंत्रज्ञान सामील करणारी कॅनडाच्या ओमसिग्नल कंपनीला ६१ कोटी रुपये निधी मिळाला.

सर्वांना निधी पुरवठा
२०१४ मध्ये व्हेंचर फंडिंगमध्ये सर्वाधिक भागीदारी - १३.७ अब्ज डॉलर - लोकांना पैसे वाचवणे किंवा लावण्यासाठी प्रेरित करणा-या कंपन्याची राहिली. स्टॉक ट्रेडिंग अॅप रॉबिनहूडने एक कोटी तीस लाख डॉलर जमवले. या कंपनीचे लक्ष्य युवावर्ग आहे.

प्रत्येक कामासाठी अॅप
स्मार्टफोनचा प्रभाव असलेल्या अॅप निर्मात्यांनी ७३० अब्ज रुपये प्राप्त केले आहेत. हे अॅप घरातील उपकरणे चालवेल. कार शेअरिंग सर्व्हिस गेटअराउंडला १४७ कोटी रुपये मिळाले. मेट्रेस कंपनी कॅस्परने ७९ कोटी रुपयांचे भांडवल मिळवले.