आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिध्‍द: मेडिकलचा प्रवेश नाकारून सांगीतिक प्रवासाची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पती एम.एस.एन. मूर्ती यांच्यासोबत पंतुला रमा.
पंतुला रमा : शास्त्रीय गायिका
-वय : ४२
-शिक्षण : संगीतात बीए आणि पीएचडी (आंध्र विद्यापीठातून)
- कुटुंब : आई-पद्मावती (वीणावादक), वडील-गोपाल राव ( व्हायोलिनवादक), मोठा भाऊ रघुराम (अमेरिकेत इंजिनिअर),
पती- एम.एस.एन. मूर्ती (व्हायोलिनवादक)
-चर्चेत : त्यांना संगीत सुधानिधी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

पंतुला यांना संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. त्यांचे पिता पंतुला गोपाला व्हायोलिनवादक आणि आई पंतुला पद्मावती वीणावादक आहेत. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी आंध्र विद्यापीठातून संगीतात पीएचडी केली. शिक्षणादरम्यान त्यांनी आपल्या गुणवत्तेतील चमक दाखवली. बीए व एमएमध्ये(संगीत) त्यांना सुवर्णपदक मिळाले. रांचीच्या केंद्रीय विद्यालयातून
शालेय शिक्षण पूर्ण झाले. बारावीनंतर त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. मात्र, गुरू आणि आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार संगीत शिक्षणाला प्राधान्य दिले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी स्वत:चे कार्यक्रम सुरू केले. रमाचे लग्नही योगायोगाने व्हायोलिनिस्ट आणि गायकाशी झाले. असे असले तरी पतीने इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंग केले आहे. त्यांची
भेट कार्यक्रमादरम्यान होत होती. रमा यांचे वडील विशाखापट्टणममध्ये स्थायिक झाले. तेव्हा विविध कार्यक्रमांना जाणे-येणे होत असे. मूर्ती यांच्या कुटुंबाचे वास्तव्य येथेच होते. यानंतर २००४ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. घरच्यांच्या संमतीनेच त्यांचा विवाह झाला. कर्नाटक संगीताच्या प्रसिद्ध गायिका जलसाक्षी त्यांची सासू आहेत. हे दांपत्य केवळ देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. यासंदर्भात "भास्कर'ला म्हणाल्या, देशाची लोकसंख्या पाहता संतती प्राप्त न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, हे तुम्ही विशेषकरून छापा. सासरच्या लोकांचाही याला पाठिंबा आहे. रमा यांना सतत नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास असतो. अस्खलित हिंदी बोलणा-या रमा यांनी सास-यांकडून रेकी शिकली व त्यात तृतीय श्रेणी प्राप्त केली.

फॅशन डिझायनिंगमध्ये रस घेणा-या रमा यांनी कारगिल युद्धावेळी संगीत कार्यक्रमातून मदत पोहोचवली. काही लोकांच्या सहकार्यातून त्या वेळी त्यांनी लाखो रुपयांचा निधी जमा केला होता. ८७ वर्षांपासून सुरू असलेल्या मारगाजी उत्सवाचेआयोजन दक्षिण भारतात दरवर्षी डिसेंबर महिन्यात होते. लहानपणापासून भाग घेणा-या रमा या वर्षी सर्वश्रेष्ठ ठरल्या
आहेत.