आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Paris Attack And New Trends In Western Countries

पॅरिस अतिरेकी हल्ल्यामुळे पाश्चिमात्य देशांसमोर नवे मार्ग शोधण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारीच्या सुरुवातीला प्रकाशाचे शहर पॅरिसमध्ये व्यंगचित्र पाक्षिक चार्ली एब्दो आणि एका सुपरमार्केटवर दहशतवादी हल्ल्यात पाश्चात्त्य देशांचे अपयश दिसते. १७ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे तीन हल्लेखोर त्या युरोपीय मुस्लिमांमध्ये सामील आहेत जे दहशतवादाच्या प्रशिक्षणासाठी मध्यपूर्वेत गेलेले आहेत. इकडे, तज्ञांनी आणखी भयानक हल्ल्यांचा इशारा दिला आहे. ब्रिटनच्या देशांतर्गत गुप्तहेर सेवेचे प्रमुख अँड्र्यू पार्कर यांनी एका जाहीर भाषणात सांगितले, सिरियात अल कायदा दहशतवाद्यांचा एक गट पाश्चात्त्य देशांविरुद्ध जीवघेण्या हल्ल्यांचे नियोजन करत आहे.
सीआयएचे माजी एजंट रॉबर्ट ग्रेनियर आपल्या नव्या पुस्तकात लिहितात, ओसामा बिन लादेनने प्रेरित ग्लोबल जिहाद इतका शक्तिशाली पूर्वी कधी नव्हता. पॅरिसचा हल्ला म्हणजे युरोपीय मुस्लिम आणि त्याच्याशी संशयित शेजा-यांमध्ये दरी तयार करण्याचे दहशतवाद्यांचे
धोरण आहे. सैद आणि चेरिफ कौआची या दोन भावांनी चार्ली एब्दोवर हल्ला करून पाश्चात्त्य देशांना पैगंबरांच्या व्यंगचित्र प्रकाशनावर मुस्लिम समाजाची संवेदनशीलता की अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन मुद्द्यांपैकी एकाची निवड करणे भाग पाडले. दुसरीकडे युरोपात राष्ट्रवादी आणि स्थलांतरितांचा विरोध करणारे पक्ष बाळसे धरू लागले आहेत. आर्थिक संकट,
युरोपियन महासंघावर संशय आणि इस्लामी दहशतवादाने या पक्षांना बळ मिळत आहे. एका सर्वेक्षणानुसार ६० टक्क्यांहून अधिक मुस्लिमेतर जर्मन लोक म्हणतात, इस्लाम पाश्चात्त्य जीवनशैलीला जुळत नाही.

फ्रान्समध्ये मेरीन ली पेन यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारांचा पक्ष नॅशनल फ्रंटने गेल्या मे महिन्यात संसदीय निवडणुकीत सर्वाधिक मते मते मिळवली. ली पेन स्थलांतरावर अंकुश लावण्यात आणि मध्यपूर्वेतील देशांशी दळणवळण मर्यादित करण्याच्या बाजूने आहेत. लंडनच्या सिटी युनिव्हर्सिटीमधील राज्यशास्त्राच्या सारा सिलवेस्त्री सांगतात, हिंसाचार
आणि त्याविरुद्ध प्रतिक्रियांमध्ये अडकलेले युरोपीय मुस्लिम वेगळे पडू लागले आहेत. दीर्घकाळासाठी ही स्थिती सामाजिक सहअस्तित्वासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते.

पॅरिस हल्ला एका घातक ट्रेंडचा भाग आहे, अशी तज्ञांना शंका आहे. हेही शक्य आहे की, बोस्टन, ब्रुसेल्स, ओटावामध्ये झालेले हल्ल्यांसारखे फ्रान्सचे हल्ले पाश्चात्त्य देशांच्या इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी अधिक लक्ष वेधण्यासाठी असुरक्षित ठिकाणांवर केले आहेत. त्यामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचाच हात असावा, हे गरजेचे नाही. अनेक हल्लेखोरांनी शांततेत अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर हल्ला केला. चार्ली एब्दोचे हल्लेखोर सैद कौआचीने २००९ ते
२०११ दरम्यान येमेनची राजधानी सनामध्ये अल कायदा प्रशिक्षकांसोबत काही महिने घालवले होते. फ्रेंच समाजशास्त्री अमेल बाउबेकेउर यांनी मूलतत्त्ववादी फरीद बेनयेतोउ आणि त्याच्या अनेक शिष्यांशी चर्चेनंतर सांगितले की, अल्जेरियाहून फ्रान्सला स्थायिक झालेले युवकांना बगदादच्या बाहेर अबू गरेब कारागृहात अमेरिकन सैनिकांनी कैद्यांना त्रास देतानाची छायाचित्रे दाखवून एकजूट केले. त्यानंतर हे तरुण काही करण्याच्या विचारात होते. फरीदच्या शिष्यांमध्ये चेरिफ कौआची देखील होता.
सुधारणेचे कार्यक्रम
मूलतत्त्ववादी विचारधारा असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यानेे चिंताग्रस्त युरोपीय देशांनी जिहादींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. फिनलँडहून अनेक दहशतवादी मध्य-पूर्वेत गेले असून तेथे दहशतवाद प्रशिक्षणाविरुद्ध कायदा आहे. फिनिश पोलिसांनी इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना तोंड देण्यासाठी अँकर नामक कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे तरुणांना नोकरी शोधण्यात मदत केली जाते. उदार इमामांची सेवा घेतली जात आहे. डेन्मार्कचे १०० पेक्षा जास्त तरुण सिरियामध्ये लढलेले आहेत. आरहस हे शहर डेनिश मूलतत्त्ववाद्यांचे केंद्र आहे. पोलिसांनी हिंसक मूलतत्त्ववाद रोखण्यासाठी
२००७ पासून अभियान सुरू केले आहे. इन्फोहस नामक केंद्र, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मूलतत्त्ववाद्यानी ग्रस्त लोकांबद्दल गुप्त माहिती गोळा करतो.
श्रद्धांजली । हॉलंडच्या गोनिन्जन शहरातील मार्टिनी टोरेन चर्चला पॅसिलच्या रूपात रोषणाईने मढवले आहे.

कारागृहे बनली जिहादींच्या शाळा
► अल कायदाचे परिणाम
युरोपातील अनेक कारागृहांत जिहादींच्या शाळा बनल्या आहेत. पॅरिसच्या सुपरमार्केटमध्ये ५ जणांची हत्या करणारा एमदी
कौलीबाली चेरिफ कौआचीसोबत कारागृहात होता. २००५मध्ये कौआचीला इराक जाताना अटक करण्यात आली. कारागृहात
दोघे अल कायदाचा दहशतवादी जमेल बेघलच्या संपर्कात आले होते. कारागृहातून बाहेर आल्यावर ते कट्टर बनले.
► दहशतवादाचा प्रवास
२०१२ मध्ये दक्षिण फ्रान्समध्ये मोहंमद मेराने ज्यूंच्या शाळेवर हल्ला करून ७ जणांचा जीव घेतला. पोलिसांना विश्वास
आहे की, चोरीच्या आरोपात शिक्षेद-यान कारागृहात तो कट्टर बनला असावा. गेल्या वर्षी ब्रुसेल्समध्ये यहुदी
म्युझियममध्ये ४ जणांची हत्या करणा-या महेमूद नेमूचीने कारागृहात जेहादचा धडा घेतला.
► ब्रिटन आणि मोरक्को
२००१ मध्ये विमान उडवण्याचा कट रचणारा रीड व २००५ मध्ये लंडन बाॅम्बस्फोटाचा कट रचणारा मुख्तार इब्राहिम ब्रिटनच्या कारागृहात दहशतवादी बनले होते. स्पेनमध्ये क्रेडिट कार्ड फसवणूक प्रकरणी शिक्षा भोगणा-याा मोहंमद अश्रफने कारागृहात काही कैद्यांसमवेत मिळून दहशतवादी गट बनवला होता.