आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Peace By Amruta Sadhana, Divya Marathi

शांतपणे राग गिळून घेणे शिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाओत्से हे चीनमधील महान ऋषी होते. मनुष्याच्या कितीही मोठ्या समस्यांवर ते सहजपणे मार्ग काढत असत. अशा लोकांचे शत्रूही खूप असतात. कारण त्यांचे माहात्म्य इतरांच्या अहंकाराला ठेस पोहोचवत असते. असे लोक मुद्दामहून त्यांना त्रास देत असत.


एका गावात लाओत्सेंवर कुणीतरी हल्ला केला. मागून काठी मारली. मात्र कुणी मारले, हे पाहण्यासाठी लाओत्सेंनी मागे वळूनही पाहिले नाही. ते रस्त्याने चालतच होते. त्या माणसाला मोठे आव्हान मिळाले. तो धावत लाओत्सेंच्या पुढे गेला. त्यांना थांबवले आणि म्हणाला, ‘वळून तरी पाहा. नाही तर माझे मारणे व्यर्थ ठरेल.’ लाओत्से म्हणाले, ‘कधी कधी चुकून आपलेच नख आपल्याला लागते. तेव्हा आपण काय करतो? कधी रस्त्याने चालताना आपण पडतो. गुडघे फुटतात, तर आपण काय करतो?’


लाओत्सेंनी त्याला एक अनुभव सांगितला. तो म्हणाला, मी एका नौकेत बसलो होतो आणि एक रिकामी नाव येऊन माझ्या नावेला धडकली. आधी मला खूप राग आला. आतून शिव्या उमटल्या. मात्र मी त्या नावेकडे पाहिले तेव्हा खूप हसू आले. नाव रिकामीच होती. ती वाहत-वाहत येत होती. मग मी काय करणार? त्या नावेत एखादा नाविक बसला असता तर त्याच्याशी भांडण झाले असते. पण नाव रिकामी होती, त्यामुळे मी काहीच केले नाही. त्याच दिवशी मला कळले की, रिकाम्या नावेला काही करता येत नाही, तर नाविक असला तरी काय फरक पडतो? तू तुझे काम केले आहेस, आता जा.


तो माणूस दुस-या दिवशी पुन्हा आला आणि म्हणाला, ‘मी रात्रभर झोपू शकलो नाही. तुम्ही काही प्रतिक्रियाच देत नाही. मी माझ्याच नजरेतून उतरलो.’ याच गोष्टीवर ओशोंनी ध्यानाची सूत्रबांधणी केली आहे. ते म्हणतात, ‘एखाद्या आठवड्यात प्रतिकारविरोधी भूमिका घेऊन छोटा प्रयोग करून पाहा. काहीही झाले तरी गिळून घ्या. ज्या गोष्टींचा काल प्रतिकार केला त्यांना आज प्रतिकार करू नका. जी ऊर्जा आपल्याकडे येत आहे, ती गिळून घ्याल. क्रोध हीदेखील एक ऊर्जा आहे. तसेच प्रेमही एक ऊर्जा आहे. दोन्हींचाही शांततेने स्वीकार करा. सात दिवसांतच तुम्ही एवढी ऊर्जा जमा कराल की तिचा हिशेबच नसेल.