आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health Mangement: वजनाची भीती बाळगण्याऐवजी शारीरिक श्रमाला महत्त्व द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी स्थूलपणा आल्यास शरीरावर अनेक प्रकारे दुष्परिणाम होतात. वय वाढू लागल्यावर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते. ६ ते ११ वर्षे वयोगटातील दर पाचपैकी एका मुलाचे वजन मर्यादेबाहेर असते. गेल्या २० वर्षांत हा आकडा दुप्पट झाला आहे. अशा मुलांना उच्च रक्तदाबासह कोलेस्टेरॉलसंबंधी समस्या उद्भवण्याचा धोका असू शकतो. कार्डिओ व्हस्कुलर डिसिजही होऊ शकतात. स्थूलपणा असलेल्या मुलांना मानसिक आणि सामाजिक समस्याही अधिक असतात. शारीरिक फरक असल्यामुळे ते भेदभावास बळी पडतात आणि मोठे होईपर्यंत ही वेदना त्यांच्या मनात घर करून राहते. शाळेपूर्वीच स्थूलपणा आलेली मुले एकतृतीयांश (२६ ते ४१ टक्के), शाळेत असताना स्थूलपणा आलेली अर्धी मुले (४२ ते ६३ टक्के ) मोठे झाल्यावरही तशीच राहतात. डायबिटीज, अस्थमा, हृदय आणि झोपेसंबंधी समस्या तसेच काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग अशा मुलांमध्ये आढळतात.

मुले शारीरिक गरजांपेक्षा जास्त आहार घेतात, तेव्हा अतिरिक्त कॅलरी फॅट्स पेशींच्या स्वरूपात साठतात. ही प्रक्रिया काही काळ सतत सुरू राहते. तेव्हा स्थूलपणा वाढण्यास सुरुवात होते. फॅट किंवा साखरयुक्त पदार्थही बहुतांश वेळा जास्त खाल्ले जातात. या पदार्थांची किती गरज आहे, याची माहिती नसल्यामुळे मुले गरजेपेक्षा जास्त खातात. टीव्हीवरील जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणा-या बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ किंवा फॅट अधिक असतात. मात्र, मुलांना हे पदार्थ आवडतात. आनुवंशिक आणि भावनिक असंतुलनामुळेही स्थूलपणा येऊ शकतो. हार्मोनसंबंधी समस्या किंवा काही विशिष्ट औषधांमुळेही मुलांची भूक वाढते. त्यामुळे अधिक आहार घेतला जातो व स्थूलपणा येतो.

बहुतांश मुलांचे वजन जादा कॅलरीजयुक्त आहाराचे सेवन व त्या तुलनेत शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे वाढते. शारीरिक हालचाल कमी किंवा अधिक करण्याच्या सवयी मुलांना लहानपणापासूनच लागतात, त्यामुळे स्थूलपणादेखील याच वयापासून दिसू लागतो. मुलांमधील शारीरिक विकासाच्या प्रक्रियेचा अंदाज आधीपासूनच लावला जाऊ शकत नाही, त्यामुळे स्थूलपणाची लक्षणेही लवकर ओळखता येत नाहीत. केवळ लठ्ठपणाच्या भीतीने मुलांच्या आहारात बदल करणे अयोग्य आहे. त्यांना वेटलॉस किंवा डाएटिंग करण्यासाठी सांगणेही चुकीचे ठरेल. कारण असे केल्यास सामान्य शारीरिक विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्वे शरीराला मिळू शकणार नाहीत. त्यामुळे मुलांचे वजन सामान्य पातळीवर आणण्यावर भर दिला पाहिजे. विशेष म्हणजे मुलांमध्ये हेल्दी इटिंग हॅबिट्स विकसित करणे आवश्यक आहे. मुलांना वाढत्या वजनाची भीती न दाखवता उत्तम आरोग्यासाठी प्रोत्साहन द्या. मुलाचे वजन जास्त असल्यास त्यांना वेगळेपणाची वागणूक देऊ नका. ठरवलेल्या वेळेला जेवण आणि नाश्ता करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र बसले पाहिजे. मुलांना आवडते पदार्थ खाण्यास रोखू नका. फक्त त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा.