आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण: योजना मांडण्यापेक्षा कार्यान्वित करणे योग्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे एक स्नेही नेहमी स्वत:च्या नव्या योजनांविषयी सांगत असतात. मात्र, त्यांच्या कल्पनाशक्तीला जो वेग आहे तो त्यांच्या शरीराला नाही. त्यांचा उद्देश चुकीचा नसतो; पण उद्देश योग्य असल्याने कामे तडीस जात नाहीत. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. केवळ वाणीपुरतेच ते राहता कामा नये. व्यक्त होऊन केवळ मानसिक आनंद होतो, प्रेरणा मिळत नाही. कृतीतून व्यक्त न झाल्यास मग भोवतालचे लोक चेष्टा करू लागतात. विश्वास ठेवत नाहीत.

असे का होते? यामागे काही मानसिक कारण आहे? न्यूरॉलॉजिकल सायकॉलॉजीचे प्रो. पीटर गोलविट्झर यांनी या प्रवृत्तीचे दीर्घकाळ अध्ययन केले. ‘आपल्या माणसांजवळ आपल्या योजनांविषयी शेअरिंग केल्यावर वेळेपूर्वी काही तरी साध्य झाल्याचे समाधान मिळते. मेंदूत काही प्रतीकचिन्हे असतात. ती स्वत:ची प्रतिमा स्वत:लाच दाखवत असतात. तुमची वाणी-कृतीतून ही प्रतीके साकार होतात. जर बोलण्याने ही प्रतिमा तयार झाली तर शरीर कृतिशील होऊ शकत नाही. हे मानसशास्त्रीय तथ्य आहे. तुमच्याकडे ऊर्जास्रोत असतो. तुमच्या शारीरिक मेहनतीने तो व्यक्त होतो अथवा मेंदूच्या कल्पनाशक्तीच्या केंद्रस्थानी जाऊन तो दिवास्वप्नात विलीन होतो. दिवास्वप्न शरीराला प्रेरणा देत नाही.

याचा सामाजिक पैलू आहे. योजनांविषयी सांगून तुम्ही स्तुती मिळवता, मात्र इतरांमध्ये ईर्षाही उत्पन्न करता. त्या ईर्षेला बळी पडता. समाजात विध्वंसात्मक ऊर्जा कार्यप्रवण असते. तुमच्या योजनांमध्ये ती बाधा ठरते. योजनांना गुप्त ठेवावे का? नाही, लक्ष्य ठरवून घ्या. ज्या लोकांनी ध्येय साध्य केले आहे त्यांच्याशी सल्लामसलत करा. कामावर फोकस करा. आपल्या हृदयाला महत्त्व द्या. त्यालाच यशाचे मर्म माहीत असते. मौन, शांत राहून, एकाग्रतेने एक एक पाऊल टाका. तुमच्या यशाला बोलते करा, मनाला नव्हे. योजनांवर जास्त चर्चा केल्याने आपली ऊर्जा नाहक वाया जाते. अल्पसंतुष्टतेपासून मुक्त व्हा. कृती करा.