आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pu La Deshpande Birth Anniversary And His Funny Jocks, Quotes

\'पु लं\'चा वाढदिवस, वाचा महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचे धम्माल-विनोदी किस्से, बघा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले असे पु. ल. देशपांडे यांचा आज (शनिवार) वाढदिवस आहे. 8 नोव्हेंबर 1919 रोजी त्यांचा मुंबईत जन्म झाला. लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व सिरिअल्सचे निर्माते-दिग्दर्शक पु. ल. यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 12 जुन 2000 रोजी पुण्यात निधन झाले.
'पु लं'चा जन्म मुंबईतील गावदेवी परिसरातील कृपाल हेमराज चाळीत झाला. या चाळीतील अविस्मरणीय अनुभवांचा त्यांच्या लेखनातही उल्लेख झालेला दिसून येतो. त्यांचे वडीलांचे नाव लक्ष्मण तर आईचे लक्ष्मीबाई देशपांडे होते. 1960 च्या सुमारास देशपांडे कुटुंब ग्रांट रोडवरील किनवे हाऊस येथे राहायला आले. त्यानंतर देशपांडे कुटुंब विले पार्ले येथे स्थायिक झाले आणि 'पु लं' पुणे या विद्येच्या माहेरघरी आले.
'पु लं'चे शिक्षण
'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज येथून कॉलेज पूर्ण केले. भास्कर संगितालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले.
'पु लं'चे दोन लग्न
त्यांचे दोन लग्न झाले. 1940 च्या सुरवातीलाच त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्या कर्जत येथील दिवाडकर कुटुंबीयांतील होत्या. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुनिता ठाकूर होते. त्या मुळच्या रत्नागिरीच्या होत्या. लग्नाच्या 54 व्या वाढदिवसी 'पु लं'चे निधन झाले.
प्रोफेशनल लाईफ
मुंबईतील ओरियंट हायस्कूलमध्ये मिस्टर आणि मिसेस देशपांडे शिक्षक म्हणून नोकरीला होते. कर्नाटकातील बेळगाव येथे काही काळ 'पु लं'नी प्रोफेसर म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि संगितकार म्हणून करिअरला सुरवात केली.
'पु. लं.'ना मिळालेले पुरस्कार
पुण्य भूषण (पुण्यभूषण) – 1993
पद्मभूषण (पद्मभूषण) – 1990
महाराष्ट्र गौरव (बहुरूपी)
पद्मश्री (पद्मश्री) – 1966
साहित्य अकादमी पुरस्कार (मराठी) – व्यक्ती आणि वल्ली (1965)
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र भूषण -1996
पुढील स्लाईडवर वाचा, पु. ल. देशपांडे यांचे अजरामर निवडक किस्से... बघा व्हिडिओ... वाचा, बघा आणि पोट धरुन हसा...
(सौजन्य- वेगवेगळे ब्लॉग, वेबसाईट आणि फेसबुुक पेजवरुन 'पु. लं'चे विनोदी किस्से आम्ही घेतले आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार.)
वेबसाईट- http://www.puladeshpande.net/
ब्लॉग- http://cooldeepak.blogspot.in/
http://mannmajhe.blogspot.in/2010/09/blog-post_07.html
http://memarathi.blogspot.in/2013/08/stories-of-pu-la-deshpande.html
फेसबुक पेज- https://www.facebook.com/pages/Pu-La-Deshpande/116170530788
आणि पु. ल. देशपांडे यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार करणारा प्रत्येक व्यक्ती आणि संस्था