आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Radha Kapoor, Divya Marathi, Parasuns School Of Designs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंदुरुस्तीच्या ध्यासातून एकापाठोपाठ एक टीमची खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधा कपूर : उद्योजिका
* वय : २९ वर्षे
*शिक्षण : मुंबईच्या जेबी पेटिट हायस्कूल, न्यूयॉर्कच्या पारसन्स स्कूल ऑफ डिझाइनमधून फाइन आर्टसमध्ये (कम्युनिकेशन डिझाइन) पदवी.
*कुटुंब : वडील- डॉ. राणा कपूर, येस बँकेचे एमडी-सीईओ, आई-बिंदू कपूर, २ लहान बहिणी- राखी (दुबईमध्ये लग्न), रोशनचे शिक्षण सुरू.
*चर्चेत : कबड्डी लीगमध्ये दबंग
दिल्ली टीम खरेदीनंतर हॉकी इंडिया लीगमधील मुंबईचा संघ खरेदी.
अद्याप नाव ठरवले नाही.

आपल्या जडणघडणीविषयी राधा यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत...
वडील जेव्हा पैशांच्या बाबतीत बोलत असत तेव्हा काही कळायचे नाही. त्यामुळे लहानपणीच एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. लहानपणी सर्जनशील होती. शाळेत कबड्डी खेळले. घरातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणींसोबत कबड्डी स्पर्धेत भाग घेतला. पेंटिंग, पियानो शिकले. सात वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टेज शो केले. व्यायामाबाबत जागरूक असल्यामुळे रोज योग करते. प्रोफेशनल स्टडीजचा विषय आला तेव्हा क्रिएटिव्हिटीची निवड केली. पारसन्स स्कूलमधून डिझायनिंग शिकले. भारतात परतल्यानंतर ड्युएट क्रिएशन कंपनी सुरू केली. कामाच्या बाबतीत वडिलांचे व माझे क्षेत्र िभन्न होते. मात्र, दररोज िडनर टेबलवर पापाकडून सल्ला घेत पुढे जात राहिले. एके दिवशी पापा म्हणाले, नवे काही करणार असेल तर आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात आण. त्या वेळी स्पॅनिश ड्राय क्लीनिंग चेन प्रॅसटोचा विचार मनात आला. ही प्रीमियम ड्राय क्लीनिंग चेन आहे. २००८ मध्ये प्रॅसटोचे शोरूम चुहूमध्ये सुरू केले. ड्राय क्लीनर महागडे कपडे साध्या कपड्यांना पेट्रोलमध्ये धूत होते. यामुळे कपड्यांचे फिनिशिंग, वर्क आिण एम्ब्रॉयडरी खराब होत होती. प्रॅसटोमध्ये या गोष्टींवर लक्ष दिले जात होते. त्यांनी २०१५ पर्यंत देशभर प्रॅसटोचे १०० आउटलेट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानंतर ब्रँड कॅनव्हस नावाचा बॉलस्क्रॅपिंग व्यवसाय सुरू केला. पारसन्स शाळेतील शिक्षणादरम्यान अशीच शाळा भारतात सुरू करण्याचा विचार आला. गेल्यावर्षी पारसन्सबरोबर टायअप करून मुंबईमध्ये इंिडयन स्कूल ऑफ िडझाइन अँड इनोव्हेशनची स्थापना केली.