आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब! सहाव्यावर्षी रहीश झाला सर्वात लहान ड्रॅग रेसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* रहीशखत्री, रायडर
* जन्म: १३डिसेंबर २००८ (मुंबई)
* वडील:मदस्सरखत्री (वाशीमध्ये सुपरबाइक शोरूम आहे.)
* शिक्षण:दक्षिणमुंबईतील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दुस-या इयत्तेतील विद्यार्थी
* चर्चेत:अॅम्बीव्हॅलीमध्ये आयोजित व्हॅली रनमध्ये ड्रॅग रेस जिंकून जगातील सर्वात लहान वयाचा ड्रॅग रेसर झाला. लंडनच्या आठवर्षीय अॅम्बर बेलचा विक्रम मोडला.

रहीश मम्मी-पप्पा अशी हाक मारण्याआधी बाइक किंवा ब्रूम... ब्रूम असे म्हणाला असावा. वडिलांचे सुपरबाइक्स शोरूम आहे, ते रायडरही आहेत. त्यामुळे रहीशचे लहानपण बाइक्समध्ये गेले. मुलानेही आपल्याप्रमाणे रायडिंगचा छंद आत्मसात करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुलानेही ही इच्छा पूर्ण केली. वयाच्या तिस-या वर्षी पहिल्यांदा वडिलांसोबत होंडा डियो स्कूटर चालवली. यानंतर वडिलांनी बाइक चालवायला सांगितल्यावर त्यास संमती दिली.
पाच वर्षांचा झाल्यानंतर रहीश वडिलांना म्हणाला, देशासाठी रेसिंग करीन. त्यावर वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी लगेच पीडब्ल्यू ८० बाइक दिली. आता त्याच्याकडे कावासाकी केएक्स ६५ आहे. रहीश होमवर्क पूर्ण करून वडाळ्यातील आयलँड रेसिंग स्कूलमध्ये सराव करत असतो. रहीशला भारतातील सर्वात लहान वयाचा मोटोक्रॉस रेसर पदवी मिळाली आहे. एका ऑटो मासिकाने त्याला जम्पिंग किड म्हणून गौरवले. त्याने रॅग रेसिंगचा सराव करता हे यातील वैशिष्ट्य आहे. ड्रॅग आणि मोटो-क्रॉस रेस स्वतंत्र आहे. ड्रॅग रेस पक्क्या रस्त्यावरून सरळ रस्त्यावर असते आणि मोटो-क्रॉस रेस स्पेशल डिजाइन्ड सर्किटवर होते. रहीशचे वडील म्हणाले, कुटुंब अभ्यासावरही लक्ष देते. त्याचे अकॅडमिक रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. यावर रहीश म्हणाला, आता माझे लक्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर आहे. मोटो जीपीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेन. रायडिंग स्किल्समध्ये परिपूर्णता यावी यासाठी सी. एस. संतोष, वॅलेंटिनी रोजी, जेम्स स्टीवर्ट आणि ड्रॅग किंग रिक्की गॅडसन यांच्यासारख्या बायकर्सचे व्हिडिओ पाहतो. त्याच्या विजयावर १२ वेळा ड्रॅग रेस जिंकणा-या रिक्की गॅसनने टि्वटर इन्स्टाग्रामवर अभिनंदन केले होते. रहीश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाईल तेव्हा प्रायोजकांची आवश्यकता भासेल. थोड्याफार पैशांची तजवीज केली आहे. मात्र, प्रायोजक तर हवाच आहे. ते लवकरच दुबईला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी घेऊन जाणार आहेत.