आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणी - भारती एकत्र: खेळ असो की व्यवसाय, स्वत:च्या मतावर राहतात ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : राजन भारती मित्तल आणि किशोर लक्ष्मीनारायण बियाणी
रिलायन्सने रिटेल काउंटर कमी केले आहे, बिर्लानेही अनेक "मोर'मध्ये कपात केली आहे. वॉलमार्ट व भारतीचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतातील रिटेलच्या व्यवसायात दिग्गज मानले जाणारे काॅर्पोरेट यशस्वी हाेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आकड्यांतून हेही स्पष्ट होते की, फ्युचर ग्रुप आणि भारती ग्रुपच्या विलीनीकरणावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. यामध्ये भारती ग्रुपचे राजन मित्तल व फ्युचर ग्रुपच्या किशोर बियाणी यांची करारात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

राजन भारती मित्तल
व्हाइस चेअरमन, भारती एंटरप्रायजेस
जन्म: १९६०
शिक्षण: पंजाब विद्यापीठातून पदवी, हार्वर्डमधून पीजी
कुटुंब: पत्नी आणि दोन मुले

राजन हे सुनील मित्तल यांच्यापेक्षा लहान आहेत. राजन आणि सुनील यांनी लहानपणी टेबल टेनिस खेळात प्रावीण्य मिळवले होते. दोघे एका बाजूने खेळत तेव्हा समोरच्याला वरचढ ठरत होते. दोन्ही भाऊ एका बाजूने खेळू शकत नसल्याचा पंजाबच्या संयोजकांनी एकदा नियम बनवला होता. जोडी फुटल्यामुळे राजन नाराज झाले होते. मात्र, विजय हा त्यांचाच होत होता. व्यवसायामध्येही दोघांची जोडी अशीच आहे.

१९७९ मध्ये सुनील यांनी सायकलच्या सुट्या भागांचा व्यवसाय सुरू केला तेव्हा मोठा भाऊ मॅनेजमेंटचा अभ्यास करत होता. महाविद्यालयातील अभ्यासादरम्यान राजन यांच्यावर फोर्जिंग युनिटची जबाबदारी होती. यादरम्यान, सर्वांचा विरोध असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि व्यवसायात लक्ष घातले. यानंतर त्यांनी हार्वर्डमधून पीजी घेतली. २००० ची घटना आहे. वायरलेस इन लोकल लूपचा वाद गंभीर झाला होता. भारती बंधू संपल्याची लोकांत भावना झाली. मात्र, ते पुन्हा उभे राहिले. या वेळी त्यांच्यासोबत मोठे भाऊ राकेशही होते.
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लुटियन बंगलोपैकी एका बंगल्याच्या मार्गावर शेरगिल होता. तो खरेदी करण्यासाठी त्यांनी वर्षभरापासून प्रयत्न चालवले होते. अखेर बंगला सर्वात छोट्या मित्तल यांच्याकडेच गेला. सुनील यांनी काही अंतरावर २००२ मध्ये असाच बंगला ३८ कोटी रुपयांत खरेदी केला होता. राजन यांनी तो १५६.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. घराचा क्रमांक मोठा भाऊ सुनीलच्या घर क्रमांकापेक्षा दुप्पट आहे. सुनील यांचा घर क्रमांक १९, तर राजन यांच्या घराचा क्रमांक ३८ आहे. वॉलमार्टसारख्या जगातील बड्या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणत भारतीही रिटेलमध्ये रस घेत नसल्याचे दिसत असताना राजन पुन्हा परतले आहेत. देशात सर्वात आधी रिटेल कॉर्पोरेट स्टाइलने सुरू करणा-या फ्युचर ग्रुपच्या बियाणी यांना त्यांनी फोन केला. मार्चमध्ये दोन्ही ग्रुपची बैठक झाली आणि आता दोघेही एकत्र काम करण्याच्या तयारीत आहेत.

ग्राहकमन जाणून घेण्यासाठी पेलतात खडतर आव्हाने

किशोर लक्ष्मीनारायण बियाणी
सीईओ, फ्युचर ग्रुप
जन्म: ९ ऑगस्ट १९६१
शिक्षण: एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबईतून पदवी, मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा
कुटुंब: पत्नी संगीता, बेटी अशनी, बेटा

त्यांच्या डोक्यात कायम व्यवसाय असतो. चुकून वेळ मिळाला तर क्रिकेट सामना बघण्यास जातात. पॅव्हेलियन तिकीट घेण्याऐवजी स्वस्तातील तिकीट घेणे पसंत करतात. लोकांचा कल समजण्यासाठी ते त्यांच्यात मिसळतात. लोकांच्या गरजांवर लक्ष ठेवा, ते किती खर्च करू शकतात हे पाहा, असे सांगत ते ग्राहकांचा खरेदीचा पॅटर्न जाणतात. सध्या लहान शहरांतही तरुण जीन्स घालून मंदिरात जात असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले. याआधी ही स्थिती नव्हती.

सुरुवातीपासून त्यांना नवे काही करण्याची आवड होती. हे मलबार हिलमध्ये राहणारे मध्यमवर्गीय कुटुंब होते. आजोबा राजस्थानच्या निम्बीतून व्यवसाय करण्यासाठी मुंबईला आले होते. इथे त्यांनी कपड्याचा व्यवसाय केला. १४-१५ वर्षीय किशोर मुंबईच्या सेंच्युरी बाजारात जाऊ लागले होते. अभ्यासाची जास्त आवड नव्हती. वडील आणि दोन भावांसोबत ते काम करत होते. मात्र, त्यांच्या कामाची पद्धत किशोर यांना अावडत नव्हती. यानंतर त्यांनी स्वत:ची मिल टाकून स्टोनवॉश विकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या दुकानाचा समावेश व्यापारी मंडळात करण्यात आला नव्हता.

२२ व्या वर्षी घरच्यांनी राठी कुटुंबातील संगीता यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. ट्राऊझरचे काम सुरू केले. १९८७ पर्यंत नवी कंपनी मेन्स वेयर प्रा. लि. सुरू केली. त्यांचे कपडे पेंटालून नावाने विकली जाऊ लागले. उर्दू शब्द पतलूनच्या जवळचा होता म्हणून या शब्दाची निवड करण्यात आली. काही निवडक दुकानांतूनच त्यांची विक्री सुरू करण्यात आली आणि १९९२ मध्ये गोव्यात पहिले पेंटालून शॉप सुरू केले आणि १९९२ मध्ये शेअर बाजारातून भांडवल उभारून ब्रँड निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत ते सुस्थितीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...