आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Reimaging India By Vinod Khosala, Divya Marathi

रिइमॅजिनिंग इंडिया: भविष्याचा वेध आज घ्या अन् मगच योजना तयार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतासारख्या उभरत्या शक्तींना एक करता येते, ते म्हणजे ते काय अनुकरण करू शकतात आणि कशापासून वाचू इच्छितात? 2000 मध्ये मी असे म्हणालो होतो की, भारताने लँडलाइन फोन वापरणे सोडावे आणि मोबाइल वापरावे. तेव्हा हे चुकीचे आणि अशक्य आहे, असे लोक म्हणते होते; पण आज ही गोष्ट शक्य झाली आणि मोबाइल नेटवर्क सर्वत्र पसरले आहे.
शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, मूलभूत सुविधा ही क्षेत्रे अशी आहेत की, जिथे बेडकाप्रमाणे उडी मारण्याची रणनीती अवलंबू शकतात आणि चांगल्या भविष्यासाठी नवे रस्ते शोधू शकता; पण प्रश्न हा आहे की रणनीती बनवायची कशी? आता सन 2025 ची योजना आताच बनवा हे सांगणे सध्या योग्य ठरणार नाही. सर्वसाधारणपणे अशा योजना उपयुक्त ठरू शकत नाहीत. योजना अशी असावी की, ठरावीक तारखेपर्यंत 40 नवी विद्यापीठे तयार होतील, 80 हजार नवे डॉक्टर तयार होतील, 9 हजार किलोमीटर हायवे तयार होतील किंवा एक कोटी सोलर पॅनल तयार होतील. अर्थात, या योजना सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. टेक्नॉलॉजी सतत बदलत असते, तेव्हा भविष्यावर सरळसरळ नजर ठेवणा-या योजनांवर इतक्यातच विश्वास ठेवणे योग्य नाही. तेव्हा भारतीय नेत्यांनी दहा ठोस लक्ष्य ठेवण्यापेक्षा एका व्यापक दिशने काम करावे आणि विकासात्मक मानसिकता बनवावी.
आता परिवहनाचेच उदाहरण घ्या. अमेरिकेत 100 पैकी 80 लोकांकडे मोटारी आहेत. तेव्हा योजना अशी करा की, उद्या भारतातही अशीच परिस्थिती निर्माण झाली तर? तेव्हा मोटार टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात होणा-या बदलांवर लक्ष ठेवा. उद्या सेल्फ ड्रायव्हिंग आणि इलेक्ट्रिक मोटारीही येऊ शकतात. तेव्हा परिवहनाची ही सिस्टिम जास्त उपयोगी ठरेल. नव्या इलेक्ट्रिक रेल्वे योजनेवर मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. असे जर झाले, तर भारताची परिवहन पद्धत काही वेगळीच असेल की ज्याच्याबद्दल सरकार आतापासूनच योजना बनवत असेल.
भारतात घरगुती बाजाराचा व्यापार मोठा आहे. त्यामुळे भावी विकासाचे नियम बदलू शकतात. आता अनुसंधान आणि विकास टॅक्स क्रेडिटचे उदाहरण घ्या, याच्यामुळेच अनुसंधान आणि विकास टॅक्स क्रेडिट वाढणार आहे. एखाद्या डेप्रिसिएशन टॅक्स क्रेडिटमध्ये अधिक गंतवणूक केल्याने सुविधांसाठी प्रोत्साहन मिळेल. पहिला कर एकसमान विकासाला चालना देईल, तर दुसरी करपद्धत अधिक कठोर आहे आणि काही कंपन्यांचाच यामुळे फायदा होतो. कोणतीही नीती कोणत्या तरी दिशेला झुकलेली असते.
भारतात नावीन्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणुकीने नवे भांडवल येणे गरजेचे आहे. आता शिक्षणाचेच उदाहरण घ्या. ऑनलाइन एज्युकेशनमुळे आता कमी गुंतवणूक करावी लागते. शिकवण्याची पारंपरिक पद्धत आता बदलत आहे. सन 2025 साठी जर भारत शिक्षणाची योजना बनवत असेल, तर त्या वेळेपर्यंत भारतात जास्तीत जास्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची गरज असेल आणि त्याच बरोबरीने हेही पाहावे लागेल की, शिक्षण क्षेत्राला नवे रूप देण्यासाठी तंत्रातील क्रांतीचा फायदा कशा पद्धतीने घेतला पाहिजे. हीच परिस्थिती आरोग्य क्षेत्राबाबतही आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील डॉक्टरांची संख्या पाहिली, तर भारत दहा पटींनी मागे आहे. याचा अर्थ असा की, सध्याच्या तुलनेत आम्हाला दहा पट जास्त वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याची गरज आहे. याला चांगला पर्याय म्हणजे आम्ही नवीन कॉम्प्युटर डायग्नोस्टिक पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. सेलफोन आणि टॅब्लेट यांच्या माध्यमातून आम्ही नवा रस्ता शोधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने डॉक्टरांकडे जाणे 80 टक्के वाचू शकते. उपचारही उत्तम मिळतील ते वेगळेच.