आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Relationship In Office By Varkha Chulani

मानसशास्त्र आणि नातेसंबंध: कार्यालयीन नातेसंबंधांत या गोष्टींवर लक्ष ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश महिलांचे कार्यालयीन नात्यांविषयी वेगळ्या प्रकारचे मत असते. अर्थात, यात योग्य किंवा अयोग्य असे काहीच नसते. या नात्याचा परिणाम काय असेल? किंवा ते सांभाळण्यास आपण सक्षम आहोत याची जाणीव असेल तरच एखाद्या नात्यात स्वत:ला गुंतवा. नात्यांबाबतची परिस्थिती चार वेगवेगळ्या प्रकारांतून समजून घेता येईल.

घटना-१ : तुमच्या संबंधात वितुष्ट आले, तर काय करणार? संबंध असणा-याशी कार्यालयात दररोज भेट होणारच. त्यामुळे अशा परिस्थितीला कसे सामोरे जाल?
घटना-२ : जोडीदाराने तुमच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी अशक्य असेल, तर काय करणार? तुमच्याकडून होणा-या त्रासाची त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली काय होईल?
घटना-३ : दोघेही एकाच टीममध्ये असतील व संबंध संपुष्टात आले तर काय करावे? अशा स्थितीत दोघांपैकी एकाला नोकरी सोडावी लागू शकते.
घटना-४ : सर्वकाही ठीक आहे आणि दोघांनाही काहीच अडचण नाही.