आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायक: मनमोहनसिंग म्हणाले होते आम्ही दोघे एकाच गावचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पत्नी पिंकी वर्मासोबत रिचर्ड राहुल वर्मा.

- रिचर्ड राहुल वर्मा :अमेरिकेत संसदीय कामकाज उपमंत्री
- जन्म : २७ नोव्हेंबर १९६९
- कुटुंब : आई-वडील - सावित्री देवी (शिक्षिका), वडील डॉ. कमल वर्मा (अमेरिकेत निवृत्त प्रो.) पत्नी पिंकी (अ‍ॅटर्नी), २ मुले, १ मुलगी.

- चर्चेत : भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदी नियुक्ती

राजदूतपदी नियुक्ती होणारे रिचर्ड भारतीय वंशाचे पहिले अमेरिकी नागरिक आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर जो कार्यक्रम सुरू होता, त्यात त्यांचे ८२ वर्षीय वडील डॉ. कमल वर्माही होते. कुटुंबात सर्वात जास्त शिकलेले डॉ. कमल १९६३ मध्ये अमेरिकेत आले होते. कुटुंब पंजाबमध्ये होते. रिचर्ड राहुल यांची आई पाच मुलांचा सांभाळ करत होती. काही वर्षांनंतर त्या पण अमेरिकेत आल्या. बर्फवृष्टीमध्ये साडी नेसलेली आपली आई बसची वाट कशी पाहत होती याची आठवण रिचर्ड जागवतात. पाच बहीण-भावांमध्ये सर्वात लहान असलेले वर्मा म्हणाले, आमच्याकडे पैसा नव्हता, वडील पीएचडी करत होते आणि आई स्पेशल नीड्स स्कूलमध्ये जात होती. पेनसिल्व्हानियामध्ये राहत असलेले कुटुंब नंतर तिथेच स्थायिक झाले. इंडस्ट्रियल
इंजिनिअरिंग केल्यानंतर लॉ व त्यापुढे एलएलएम केले. पत्नी पिंकी (मेलिनेह) यांनीही
अमेरिकी विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग अमेरिका दौ-यावर होते. व्हाइट हाऊसच्या कार्यक्रमात त्यांचे वडील म्हणाले, आपण व मनमोहन सिंग एकाच भागातील आहोत. पंतप्रधानांची भेट झाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. सिंग वर्मांना म्हणाले, तुम्ही भारतीय आहात. त्यावर वर्मा म्हणाले, होय, वर्मांना पुन्हा विचारले, तुम्ही कुठले? त्यावर उत्तर होते पंजाब जालंधरचा. त्या वेळी मनमोहनसिंग ओबामांना म्हणाले, मी आणि यांचे वडील एकाच शहरातील आहोत.