आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबासाठी दंतचिकित्सक, स्वत:साठी झाले संगीतकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* रिकी केज, संगीतकार-निर्माता
* जन्म : 5ऑगस्ट 1981
* शिक्षण: ऑक्सफर्डडेंटल कॉलेज, बंगळुरू येथून डेंटिस्टची पदवी.
* कुटुंब: पत्नीवर्षा केज (तालवादक)
* यामुळे चर्चेत : विंड्सऑफ समसारला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

पंजाबी-मारवाडी कुटुंब असलेले रिकी आठ वर्षांचे होते तेव्हा बंगळुरूत आले. रिकी यांचे वडील आजोबा दोघेही डॉक्टर. भाऊ पण ऑर्थोडेंटिस्ट. रिकी यांनीही तेच क्षेत्र निवडले. मात्र त्यांचे मन संगीत क्षेत्रात रमत असे. या क्षेत्रातही खूप काही करता येते हे आई-वडिलांना पटवणे कठीण होते. रिकी यांनी संगीत क्षेत्र निवडले तेव्हा कुटुंबीय खूप नाराज झाले. यावर डेंटलमध्ये पदवी मिळवल्यानंतर संगीत क्षेत्रात शिक्षण घेण्याचे ठरले.

ते कॉलेज बुडवून एखाद्या संगीत स्पर्धेत भाग घेण्यासाठी जायचे. एवढे असूनही अभ्यासात मात्र रिकी मागे नव्हते. दंतवैद्यक पदवी मिळवेपर्यंत त्यांनी सुमारे हजार जिंगल्स (मधुर संगीत) तयार केल्या होत्या. पहिली इलेक्ट्रॉनिक्स गिटार मिळाली तेव्हा दोन दिवस ते खाता-पिता फक्त गिटारच वाजवत होते. पाच कानडी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. आज सुमारे हजार जिंगल्स त्यांच्या नावे आहेत. २०११ मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद‌्घाटनाच्या संगीताने रिकी यांना प्रसिद्धी मिळाली. सध्या ते बंगळुरूत स्टुडिओ चालवतात. येथेच त्यांनी "विंड्स ऑफ समसार' रचले. पत्नी वर्षा स्टुडिओच्या मॅनेजर आहेत. नुसरत फतेह अली खान पीट गॅब्रिएल हे रिकी यांची श्रद्धास्थाने आहेत. या दोन महान कलाकारांची त्यांना प्रेरणा मिळते. ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला तेव्हा बँकस्टे्रज हेन्स जिमर यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा क्षण आपण कधीही विसरू शकत नाही, असे रिकी म्हणतात. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनीही टि्वटवर रिकी यांचे अभिनंदन केले होते.